मुंबई, 16 नोव्हेंबर : तंत्रज्ञान हे अतिशय वेगाने प्रगती करतंय. डायल रिंगचे फोन जाऊन स्मार्टफोन आला. एका क्लिकवर सगळं जग जवळ आलं. तसंच जुन्या पद्धतीचे अँटिनावाले टीव्ही ही इतिहासजमा झाले. आता सध्या स्मार्ट टीव्हीचा जमाना आहे. या स्मार्टयुगात तंत्रज्ञानाने सगळं शक्य केलं आहे. हल्ली अनेकांकडे स्मार्ट टीव्ही असतात. प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन घेत असतो. परंतु, विविध ई-कॉमर्स वेबसाईट्स स्मार्ट टीव्ही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स जाहीर करतात. यामुळे अगदी रास्त दरांत आणि एक्सचेंज ऑफरअंतर्गत स्मार्ट टीव्ही विकत घेणं शक्य होतं. ‘फ्लिपकार्ट’ या ई-कॉमर्स वेबसाईटवर ही ऑफर सुरू आहे. जाणून घेऊयात या विविध ऑफर्सबद्दल अधिक माहिती.
फ्लिपकार्टवर सध्या 55 इंचांच्या स्मार्ट टीव्हीवर ऑफर्स सुरू आहेत. यामुळे ज्यांना 55 इंचांचा स्मार्ट टीव्ही विकत घ्यायचा असेल, त्यांच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरू शकते.
फ्लिपकार्टवर हायसेन्स कंपनीचा 55 इंचांच्या एलईडी स्मार्ट गुगल टीव्हीची किंमत 69,990 रुपये आहे. हा अल्ट्रा एचडी टीव्ही आहे. परंतु, यावर 38 टक्क्यांची सवलत देण्यात येतेय. यामुळे याची किंमत 42,990 इतकी झाली आहे. अर्थात, तुमची 27,000 रुपयांची बचत होते आहे. तसंच अॅक्सिस बॅंकेच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकेल. तसंच एक्सचेंज ऑफरअंतर्गत घरातील जुना टीव्ही दिल्यास तुमची 11000 रुपयांची बचत होईल.
तसंच व्युग्लो एलईडी स्मार्ट गुगल टीव्हीची किंमत 65,000 रुपये आहे. हा 55 इंचांचा अल्ट्रा एचडी टीव्ही आहे. यावर 40 टक्के सूट मिळत असून, सूट वजा करता याची किंमत 38,999 रुपये होते. तसंच अॅक्सिस बॅंकेच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसंच स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि अॅक्सिस बॅंकेच्या ईएमआयद्वारे खरेदी केल्यास 1500 रुपयांची बचत होईल. एक्सचेंज ऑफरद्वारे जुन्या टीव्हीच्या बदल्यात हा नवा टीव्ही घेतल्यास 16,900 रुपयांची बचत होईल.
फ्लिपकार्टवर तोशिबा कंपनीच्या एलईडी स्मार्ट गुगल टीव्हीची किंमत 79,990 रुपये आहे. हा 55 इंचांचा टीव्ही असून, अल्ट्रा एचडी टीव्ही आहे. यात बास वूफर आणि रेग्झा इंजिनची सोय आहे. यावर तुम्हाला 41 टक्के सूट मिळते आहे. यामुळे याची किंमत 46,990 रुपये होते. अर्थात, तुमची 33,000 ची बचत होते आहे. अॅक्सिस बॅंकेच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकेल. जुन्या टीव्हीच्या बदल्यात हा नवीन टीव्ही घेतल्यास 11,000 रुपयांची बचत होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.