iPhone घेणार असाल तर हे मॉडेल आहे सर्वोत्तम! Apple चे CEO सुद्धा म्हणतात याला मजबूत

iPhone घेणार असाल तर हे मॉडेल आहे सर्वोत्तम! Apple चे CEO सुद्धा म्हणतात याला मजबूत

ॲपल कंपनीचे सीईओ (Apple CEO) टिम कूक (Tim Cook) यांनी 2021 मध्ये झालेल्या गुंतवणूकदारांच्या बैठकीत कुठल्या मॉडेलला जास्त मागणी आहे याबद्दल सांगितलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 एप्रिल -ॲपल कंपनीचा (Apple) आयफोन हा जगात सर्वात प्रसिद्ध फोन आहे आणि दिवसेंदिवस कंपनीचा नफा वाढत आहे. आयफोनच्या विक्रीचं प्रमाण प्रचंड वाढलं असून, आयफोन फॅमिलीतील आयफोन(iphone)12 हे मॉडेल जगात सर्वात लोकप्रिय ठरत आहे. म्हणजे इतर मॉडेल चालत नाहीत असं नाही पण ग्राहक आयफोन 12 च्या प्रो, प्लस आणि मॅक्स या तीन प्रकारचे फोन मोठ्या प्रमाणात खरेदी करतात अशी माहिती ॲपल कंपनीचे सीईओ टिम कूक यांनी 2021 च्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये झालेल्या गुंतवणूकदारांच्या बैठकीत दिली.

विक्री प्रचंड वाढली

टिम म्हणाले,‘पहिल्यांदा आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तसंच जुना आयफोन देऊन नवा घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. संपूर्ण जगात आयफोनची विविध मॉडेल्स खपत आहेत. अमेरिकेत सर्वोत्कृष्ट पहिल्या 5 मध्ये, चीनमध्ये पहिल्या दोनमध्ये, जपानमध्ये पहिल्या 4 मध्ये तसंच यूकेमध्ये पहिल्या 4 मध्ये आयफोनचीच मॉडेल्स आहेत.’भारतात आयफोन 12 ची किंमत 79 हजार रुपये आहे.

विक्रमी विक्री

कंपनीने या वर्षाच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये विक्रमी रेव्हेन्यू मिळवला आहे. कंपनीने या काळात 89.6 बिलियन डॉलरचा व्यवसाय केला आहे. गेल्यावर्षीपेक्षा हे प्रमाण 54 टक्क्यांनी जास्त आहे. आयपॅड(ipad)आणि मॅकचीही(MAC)विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे.

Aadhaar लिंक मोबाईल नंबर विसरलात; घरबसल्या फक्त 2 मिनिटांत असा शोधा

अनेक लोक घरातूनच काम करत आहेत त्यामुळेच कंपनीच्या सर्वच डिव्हायसेसची विक्री तुफान वाढली आहे. प्रत्येक देशातील विक्रीमध्ये कमीतकमी 35 टक्क्यांची वृद्धी झालेली आहे. अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 34.3 बिलियन डॉलरची डिव्हायसेस अधिक विकली गेली. चीनमध्ये दुसऱ्या क्वार्टरमध्ये हे प्रमाण 17.7 बिलियन डॉलर होतं जे गेल्यावर्षी 9.4 बिलियन डॉलर होतं. त्यामुळे जरीही जगात कोरोना महामारीमुळे महागाई वाढली असेल, आर्थिक संकट आलं असलं तरीही आयफोनची विक्री मात्र कमी झालेली नाही.आयफोन हा हाताळायला एकदम हलका, आकाराला लहान आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावतता हे आयफोनचे गुण सगळ्यांना त्याकडे आकर्षित करतात.

तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत

आयफोन 12 ची(iphone 12)जगाबरोबरच भारतातही भरपूर मागणी आहे. तरुणाई तर त्यावर तुटूनच पडते. हा फोन घेण्यासाठी अनेक जण कर्जही काढतात. त्यात आता कंपनीच्या सीईओंनीच जर हा फोन सर्वोत्तम आहे असं जाहीर केलं तर आयफोन घेणं गरजेचंच म्हणावं लागेल. कधी घेताय मग आयफोन 12, करा तयारी.

First published: April 30, 2021, 1:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या