Home /News /technology /

WhatsApp चं नवं फीचर; आता बदलणार Voice मेसेज पाठवण्याची पद्धत

WhatsApp चं नवं फीचर; आता बदलणार Voice मेसेज पाठवण्याची पद्धत

व्हॉट्सॲपवरच्या व्हॉईस मेसेजिंग फीचरमध्ये वेव्हफॉर्मची सुविधा देण्यासंबंधी चाचण्या सुरू आहेत. सध्या इन्स्टाग्राममध्ये व्हॉईस मेसेज पाठवताना वेव्हफॉर्म फीचरचा वापर करता येतो.

नवी दिल्ली, 29 जून : फेसबुकच्या (Facebook) मालकीचं असलेलं व्हॉट्सॲप (WhatsApp) जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम (Instagram) आपल्या ग्राहकांना सातत्याने वेगवेगळी फीचर्स उपलब्ध करून देत असतात. आता इन्स्टाग्रामवर व्हॉईस मेसेज पाठवताना उपलब्ध असलेलं एक फीचर लवकरच व्हॉट्सॲपमध्ये उपलब्ध करून देण्याचा विचार फेसबुक करत असल्याचं वृत्त WAbetainfo ने दिलं आहे. व्हॉट्सॲपवरच्या व्हॉईस मेसेजिंग फीचरमध्ये वेव्हफॉर्मची सुविधा देण्यासंबंधी चाचण्या सुरू आहेत. सध्या इन्स्टाग्राममध्ये व्हॉईस मेसेज पाठवताना वेव्हफॉर्म फीचरचा वापर करता येतो. ज्यात व्हॉईस मेसेज रेकॉर्ड (Voice Message Recording) करताना रियल टाइम वेव्हफॉर्म पाहता येतो. त्यामुळे मेसेज पाठवण्यापूर्वी युजर मेसेज तपासू शकतो आणि गरज पडली, तर त्यात सुधारणाही करू शकतो. व्हॉट्सॲपवर येणाऱ्या फीचर्सचं टेस्टिंग WAbetainfo करतं त्यामुळे त्यांनी या आगामी फीचरबद्दल माहिती दिली आहे. लवकरच व्हॉट्सॲपमध्येहे फीचर वापरायला मिळू शकेल.

(वाचा - Google वर या गोष्टी सर्च करण्याची चूक करू नका, तुरुंगात जाण्यासह बसेल मोठा फटका)

सुरुवातीला तपासणीसाठी बीटा व्हर्जन व्हॉट्सॲप (WhatsApp Beta Version) वापरणाऱ्यांना हे फीचर उपलब्ध करून दिलं जाईल. व्हॉट्सॲपने आणखी एक नवं फीचर आणलंय, ज्यामुळे युजर त्याला आलेला व्हॉईस मेसेज वेगाने ऐकू शकतो. वेगाने म्हणजे 1x, 1.5x व 2x या पटीत युजर आलेल्या मेसेजमधील आवाजाची गती वाढवू शकतो. हे फीचर भारतातही लाँच झालं असून नव्याने व्हॉट्सॲप अपडेट केल्यानंतर ते काही स्मार्टफोन्समध्ये उपलब्धही झालंय.

(वाचा - तुम्हीही डाउनलोड केलं का GB WhatsApp? लगेच करा डिलीट, अन्यथा बसेल मोठा फटका)

Multi-Device सपोर्ट - त्याचबरोबर व्हॉट्सॲपवर नवं मल्टी-डिव्हाइस सपोर्ट हे नवं फीचर येणार आहे. या फीचरमुळे व्हॉट्सॲपचं एकच अकाउंट युजर चार वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये (Multiple Devices) वापरू शकतील. हे फीचर वापरून जर तुम्ही एका डिव्हाइसवर व्हॉट्सॲप लॉगइन केलंत, तर इतर सर्व डिव्हाइसवर तुम्ही लॉगइन केल्याचा मेसेज दिसणार आहे. नवीन फीचर्स या कंपन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सात्याने सादर करत असतात. ग्राहकांना आकर्षित करणं आणि त्यांना वापरात सहजता देणं हाच त्यांचा उद्देश असतो.
First published:

Tags: Tech news, WhatsApp features, Whatsapp News

पुढील बातम्या