मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Alert : ‘या’ आयफोन आणि अँड्रॉइड फोन्सवर आता Whatsapp वापरता येणार नाही

Alert : ‘या’ आयफोन आणि अँड्रॉइड फोन्सवर आता Whatsapp वापरता येणार नाही

 जुन्या आयफोन (iPhone) आणि अँड्रॉइड फोन्सवर (Android) आता नव्या वर्षात whatsapp वापरता येणार नाही. तुमचा फोन अपडेटेड आहे का तपासा

जुन्या आयफोन (iPhone) आणि अँड्रॉइड फोन्सवर (Android) आता नव्या वर्षात whatsapp वापरता येणार नाही. तुमचा फोन अपडेटेड आहे का तपासा

जुन्या आयफोन (iPhone) आणि अँड्रॉइड फोन्सवर (Android) आता नव्या वर्षात whatsapp वापरता येणार नाही. तुमचा फोन अपडेटेड आहे का तपासा

नवी दिल्ली, 16 डिसेंबर :  दरवर्षी जुन्या आयओएस (iOS) आणि स्मार्टफोन्सला (Smart Phone) मिळणारा व्हॉट्सॲपचा (Whatsapp) सपोर्ट बंद केला जातो. मागच्या वर्षी आयओएस 8 (iOS 8) आणि 2.3.7 या व्हर्जन्सवर चालणाऱ्या तसेच जुन्या अँड्रॉइड (Android) स्मार्टफोनवरील (Smart Phone) व्हॉट्सॲप सपोर्ट बंद झाला होता. 2020 हे वर्ष संपण्यास अगदी थोडे दिवस बाकी असताना फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सॲपने (Whatsapp) जुन्या अँड्रॉइड स्मार्टफोन्स आणि आयओएसचा सपोर्ट बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केलं आहे. यामुळे जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आयओएस फोन्समध्ये आता व्हॉट्सॲप (Whatsapp) सुविधा मिळणार नसल्याचं निश्चित झालं आहे. आता ios 9 आणि अँड्रॉइड 4.0.3 या ऑपरेटिंग सिस्टीम वरच (Operating System) व्हॉट्सॲप (Whatsapp) चालू शकणार आहे. व्हॉट्सॲपने (Whatsapp)  आपल्या युझर्सला सर्व सेवांचा आनंद घेता यावा यासाठी ऑपरेटिंग सिस्टीमची नवी एडिशन (Edition) वापरण्याची शिफारस केली आहे. आयफोन्सवर (iphone) व्हॉट्सॲप  (Whatsapp) वापरता यावे यासाठी आयएसओ 9 किंवा त्यापुढील ऑपरेटिंग सिस्टीमचा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. तसेच अँड्रॉइड स्मार्टफोन (Android Smartphones) युझर्सला व्हॉट्सॲप वापरता यावे यासाठी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 4.0.3 किंवा त्यापुढील व्हर्जनची ऑपरेटिंग सिस्टीम असणे आवश्यक आहे. आज जुन्या आपरेटिंग सिस्टीमवर स्मार्टफोन्स चालत नसले, तरी कोणत्या विशिष्ट स्मार्टफोनवर हे मेसेजिंग अॅप चालणार नाही याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. आयफोनचा विचार करता, आयफोन 4 पर्यंतच्या सर्व मॉडेल्सवर यापुढे हे अप चालू शकणार नाही. याचाच अर्थ जे ग्राहक आयफोन 4S, आयफोन 5, आयफोन 5S, आयफोन 6 आणि आयफोन 6S वापरतात त्यांनी आपल्या आयफोनवरील ऑपरेटिंग सिस्टीम आयओएस 9 वर अपडेट करुन घेतल्यास त्यांना व्हाटसअप वापरणे शक्य होईल. अँड्रॉइडचा विचार करता, जे युझर्स 4.0.3 पेक्षा जुन्या आपरेटिंग सिस्टीमवर आधारित स्मार्टफोन वापरतात त्यांची व्हॉट्सॲप सुविधा बंद होणार आहे. परंतु, अनेक स्मार्टफोन्स यापेक्षा जुन्या आपरेटिंग सिस्टीमवर चालत नाहीत. तथापि, एचटीसी डिझायर, एलजी ऑप्टिमस ब्लॅक, मोटोरोला ड्राईड रेझर आणि सॅमसंग गॅलक्सी S2 या  मॉडेल्सचा त्यात समावेश आहे. जे युझर्स जुन्या व्हर्जनवरील स्मार्टफोन वापरत आहेत ते यावर्षीच्या अखेरीपासून व्हॉट्सॲप सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. मात्र जुन्या व्हर्जनवर पॅचसह अपडेट मिळाले तर काही युझर्स जुनी आॅपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या स्मार्टफोनवरही व्हॉट्सॲप वापरु शकणार आहेत. अन्यथा या युझर्ससाठी नवा स्मार्टफोन खरेदी करणे हाच उपाय आहे. आॅपरेटिंग सिस्टीमविषयी असे जाणून घ्या आयफोन युझर्स फोनमधील सेटिंग (Setting) - जनरल इन्फार्मेशन (Genaral Information) या आॅपन्शवर जाऊन साॅफ्टवेअरचे व्हर्जन (Software version) जाणून घेऊ शकतात. तसेच अँड्रॉइड युझर्स सेटींग (Setting) - अबाऊट फोन (About Phone) या आॅपन्शवर जाऊन सध्याच्या अँड्रॉइड व्हर्जनविषयी माहिती घेऊ शकतात. व्हॉट्सॲप  (Whatsapp) दरवर्षाच्या अखेरीस जुन्या स्मार्टफोनवरील सेवा बंद करते. गतवर्षी आयओएस 8 किंवा त्याहून जुन्या व्हर्जनच्या आयफोनवरील सेवा व्हॉट्सॲपने  (Whatsapp) बंद केली होती. तसेच अँड्रॉइड 2.3.7 किंवा त्यापेक्षा जुन्या व्हर्जन असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनवरील सेवा व्हॉट्सॲपने बंद केली होती.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Apple, Iphone, Phone, Smartphone, Technology

पुढील बातम्या