आजपासून 'या' स्मार्टफोनमधील WhatsApp होणार बंद, यामध्ये तुमचा फोन तर नाही?

आजपासून 'या' स्मार्टफोनमधील WhatsApp होणार बंद, यामध्ये तुमचा फोन तर नाही?

आता तुमच्या फोनमधून हेच WhatsApp गायब होणार आहे. ते कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आजपासून मोबाईलच्या अनेक मॉडेल्समध्ये हे अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. काही मोबाईलच्या मॉडेल्समधून आता WhatsApp हद्दपार होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 1 फेब्रुवारी : सध्या सर्वात जास्त वापरलं जाणारं चॅटिंग अ‍ॅप म्हणून WhatsAppचा बोलबाला आहे. अगदी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि मित्रांच्या चॅटिंगपासून ऑफिसच्या कामाच्या ग्रूपपर्यंत सर्व गोष्टी या सगळ्यात जास्त WhatsApp वर डिस्कस होतात. मात्र आता तुमच्या फोनमधून हेच WhatsApp गायब होणार आहे. ते कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आजपासून मोबाईलच्या अनेक मॉडेल्समध्ये हे अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. काही मोबाईलच्या मॉडेल्समधून आता WhatsApp हद्दपार होणार आहे. यामध्ये तुमच्या मोबाईलचा तर समावेश नाहीना हे एकदा चेक करून घ्या.

कम्युनिकेशनचं माध्यम म्हणून WhatsApp कडे पाहिलं जातं. मात्र काही मोबाईलच्या मॉडेल्समधून WhatsApp गायब होणार आहे. अ‍ॅप वापरणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे करणं आवश्यक असल्याचं कारण WhatsApp कंपनीकडून देण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी आपल्या अ‍ॅपमध्ये अनेक वेगवेगळे फिचर्स आणि सिक्युरिटी अपडेट्स देत आहे. कंपनीच्या या निर्णयाचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे आजपासून अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणाऱ्या काही ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नसल्याची माहिती कंपनीने वेबसाइटवर दिली आहे. आजपासून ios8 आणि त्याआधीच्या मॉडेल्समधील WhatsApp सुविधा बंद होणार आहे. आयफोन 6 आधीच्या सर्व मॉडेल्समधून ही सुविधा बंद करण्यात आली आहे. तर आयफोन 6 नंतरच्या मॉडेलमध्ये हायसिक्युरिटी असलेलं WhatsApp वापरण्यात येणार आहे.

जुनं वर्जन वापरणाऱ्यांनी WhatsAppचं नवं वर्जन अपडेट केलं नसेल तर आताच करून घेण्याचं आवाहनही कंपनीकडून करण्यात येणार आहे.

जुन्या अँड्रॉइडधारकांनाही कंपनीकडून आवाहन

ज्यांचे टु जी फोन असलेले जुने अ‍ॅन्ड्रॉइड फोन आहेत अशा म्हणजेच 2.3.3 वर्जन असणाऱ्या ग्राहकांना WhatsApp ची सुविधा उपलब्ध होणार नाही.

विंडोज ऑपरेटींग सिस्टिमसाठी असा असेल नियम

विंडोज मॉडेलच्या विचार करायचा झाला तर 8.1 आणि त्यानंतरच्या नव्या सर्व वर्जनसाठी WhatsApp वापरता येणार आहे. त्याआधीच्या वर्जनसाठी ह्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

या आधीही WhatsAppने 30 जून 2017 रोजी नोकीया S60, 31 डिसेंबर 2017 ब्लॅकबेरी आणि ब्लॅकबेरी 10च्या मॉडेलमधील WhatsApp बंद करण्यात आलं होतं.

WhatsAppकडून युझरसाठी  नवं फीचर

WhatsAppने सुमारे चार वर्षांपूर्वी अ‍ॅपमध्ये व्हॉईस कॉलिंग फीचर सादर केले होते आणि आता कंपनीने त्यात एक मोठा बदल सादर केला आहे. WhatsAppने अँड्रॉइड युझरसाठी कॉल वेटिंग हे नवं फीचर आणले आहे. व्हॉईस कॉलिंगमध्ये युजर्सना, जेव्हा एक फोन चालू असताना दुसरा कोणताही कॉल दिसत नव्हता. मात्र आता कॉल वेटिंग असा पर्याय दिसणार आहे.उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा युजर WhatsApp कॉलवर असतो आणि दुसरा व्यक्ती कॉल करण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत तो कॉलची प्रतिक्षा करताना दिसेल. यात तो कॉल वेटिंगवर ठेऊ शकतो किंवा दुसरा कॉल घेऊ शकतो. यासारखे whatsapp अनेक नवनवीन फिचर्स आणि सिक्युरिटी अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. अफवा आणि चुकीच्या पद्धतीनं पाठवल्या जाणाऱ्या मेसेजवर करडी नजर ठेवणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

First published: February 1, 2020, 5:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading