मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp मध्ये येणार तीन नवे फीचर्स, जाणून घ्या या Features बाबत

WhatsApp मध्ये येणार तीन नवे फीचर्स, जाणून घ्या या Features बाबत

WhatsApp Web वरही मेसेज ओपन न करताच वाचता येतो. त्यासाठी चॅटवर कर्सल घेऊन जा. कर्सल चॅटवर केवळ ठेवल्यानंतर लेटेस्ट मेसेज दिसेल. यात सेंडरला मेसेज पाहिल्याबाबत कोणतीही माहिती मिळणार नाही.

WhatsApp Web वरही मेसेज ओपन न करताच वाचता येतो. त्यासाठी चॅटवर कर्सल घेऊन जा. कर्सल चॅटवर केवळ ठेवल्यानंतर लेटेस्ट मेसेज दिसेल. यात सेंडरला मेसेज पाहिल्याबाबत कोणतीही माहिती मिळणार नाही.

या फीचर्सबद्दल व्हॉट्सअ‍ॅप बीटा इन्फोवरील एका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये कॅथकार्ट आणि मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत माहिती दिली.

नवी दिल्ली, 7 जून : व्हॉट्सअ‍ॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट (Will Cathcart) आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Facebook CEO Mark Zuckerberg ) यांनी व्हॉट्सअ‍ॅपसाठी काही नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. या नव्या फीचर्समध्ये मल्टी डिव्हाईस सपोर्ट (multi device support), स्वतःहून डिलीट होणारे मेसेज (Disappearing mode) आणि व्ह्यू वन्स (view once) या फीचर्सचा समावेश असेल. या फीचर्सबद्दल व्हॉट्सअ‍ॅप बीटा इन्फोवरील एका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये कॅथकार्ट आणि मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत माहिती दिली. कॅथकार्ट यांनी सांगितलं की, मल्टी-डिव्हाईस सपोर्ट कंपनीला आयपॅडसोबत व्हॉट्सअ‍ॅप सपोर्टसाठी काम करण्याची परवानगी देईल.

मल्टी- डिव्हाईस सपोर्ट (multi device support) -

बहुप्रतीक्षित मल्टी-डिव्हाईस सपोर्ट लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध होईल, असंही मार्क झुकरबर्ग आणि कॅथकार्ट यांनी सांगितलं. बीटा युजर्ससाठी या फीचरचं टेस्टिंग सार्वजनिकपणे येत्या एक ते दोन महिन्यात सुरू होईल, असंही सांगण्यात येत आहे. कंपनी या फीचरच्या माध्यमातून युजर्सना एकाच वेळी चार डिव्हाईसवर साईन इन करण्यासाठी परवानगी देण्याचा विचार करत असल्याचं कॅथकार्ट यांनी सांगितलं.

व्हॉट्सअ‍ॅप गेल्या काही दिवसांपासून या फीचरवर काम करत असून, या फीचरच्या डेव्हलपमेंट दरम्यान अनेक अडचणी आल्या. सर्व मेसेजेस आणि कंटेट सिंक करणं हे कंपनीसमोरचं मोठं टेक्निकल आव्हान होतं, असं मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं. मल्टी डिव्हाईस सपोर्ट हे फीचर युजर्सला एखाद्या डिव्हाईसवर लॉग आऊट केल्याशिवाय दुसऱ्या डिव्हाईसवर अकाउंट लॉग इन करून वापरण्याची परवानगी देईल, असंही ते म्हणाले.

(वाचा - जगभरात या Emoji ला सर्वाधिक पसंती, तुम्हीही हा इमोजी वापरता का?)

डिसअपियरिंग मोड (Disappearing mode)  -

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचर्समध्ये एक डिसअपियरिंग मोड (Disappearing Mode) नावाचं फीचर आहे. डिसअपियरिंग मोड एखाद्या पर्सनल चॅटसाठी वापरलं जाऊ शकतं. या फीचरमुळे चॅटमधील मेसेज एका आठवड्यात गायब होईल. दुसरीकडे डिसअपियरिंग मोड तुमच्या अकाउंटच्या सर्व चॅट आणि ग्रुप्ससाठीही डिफॉल्ट म्हणून डिसअपियर होणाऱ्या मेसेज फीचरला ऑन करतो. जेणेकरून सर्व चॅट एका आठवड्यात गायब होतील.

(वाचा - तुमचं Facebook, Twitter आणि Instagram कधीच होणार नाही हॅक; असं ठेवा सुरक्षित)

व्ह्यू वन्स (View Once) -

कॅथकार्ट आणि झुकेरबर्ग यांनी ज्या तिसऱ्या फीचरबद्दल सांगितलंय ते आहे ‘व्ह्यू वन्स’ फीचर. युजरने कंटेट पाठवल्यानंतर समोरच्या व्यक्तीने तो एकदा पाहिला की तो गायब होईल. हे फीचर सध्या स्नॅपचॅटमध्ये उपलब्ध आहे. या फीचरमुळे समोरची व्यक्ती केवळ एकदाच मेसेज आणि मीडिया फाईल पाहू शकते.

First published:

Tags: WhatsApp features, Whatsapp News