WhatsApp होईल ब्लॉक! कंपनीने दिला इशारा, करू नका 'या' चुका

WhatsApp होईल ब्लॉक! कंपनीने दिला इशारा, करू नका 'या' चुका

WhatsApp नं गेल्या तीन महिन्यात 20 लाख अकाउंट ब्लॉक केली आहेत तर यापुढे कायदेशीर कारवाई केली जाईल असंही कंपनीने सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जुलै : WhatsApp हे सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मिडिया मेसेजिंग अॅप आहे. यावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना रोखण्यासाठी आतापर्यंत कंपनीने अनेक बदल केले आहेत. यात एकाचवेळी किती लोकांना मेसेज पाठवता यावा यावर मर्यादा घातली. त्यानंतर मेसेज फॉरवर्ड असेल तर तेसुद्धा समजण्यासाठी नवं फिचर अॅड केलं. आता व्हॉटसअॅपचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा कंपनीनं दिला आहे. कंपनीनं म्हटलं आहे की एकाचवेळी अनेक मेसेज पाठवणे किंवा अॅटोमेटेड मेसेज पाठवणं हे नियम आणि अटींचं उल्लंघन आहे. असे करणाऱ्यांवर कंपनी कायदेशीर कारवाई करेल.

व्हॉटसअॅप आता मशिन लर्निंग टेक्नॉलॉजीचा वापर करून भावना भडकावण्याऱ्या पोस्ट किंवा अपशब्द असलेल्या मेसेजस ओळखणार आहे. वारंवार नियमांचं उल्लंघन केल्यास त्या लोकांचे व्हॉटसअॅप अकाउंट डिलीट केलं जाईल. व्हॉटसअॅपनं त्यांच्या FAQ पेजवर सांगितलं आहे की, कोणताही युजर किंवा संस्था एकाच वेळी अनेक मेसेज, अॅटोमेटेड मेसेज पाठवत असल्याचं निदर्शनास आल्यास 7 डिसेंबरनंतर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल. कंपनीने मात्र काय कारवाई केली जाईल हे सांगितलं नाही.

व्हॉटसअॅपनं सांगितलं की, या प्लॅटफॉर्मला पर्सनल मेसेज पाठवण्यासाठी तयार केलं होतं. मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवणं आणि दुरुपयोग करण्यासाठी हे तयार करण्यात आलेलं नाही. गेल्या तीन महिन्यात व्हॉटसअॅपनं बल्क मेसेज किंवा अॅटोमेटेड मेसेज पाठवणाऱे 20 लाख अकाउंट ब्लॉक केली आहेत. जगभरात व्हॉटसअॅपचे 150 कोटी युजर्स आहेत.

व्हॉटसअॅपवरून चुकीची माहिती पसरवल्यानं हिंसाचाऱाच्या घटना गेल्या वर्षी देशात घडल्या. त्यानंतर व्हॉटसअॅपनं एकावेळी मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा 256 वरून फक्त 5 वर आणली. त्यानंतर मेसेज फॉर्वर्डेड असेल तर त्याचं नोटिफिकेशनही मेसेजच्या वरती दिसतं. जर मेसेज फॉर्वर्डेड नसेल तर त्यावर कोणतंही नोटिफिकेशन येत नाही.

VIDEO: मुंबईत 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नराधमाची काढली नग्न धिंड

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: whatsapp
First Published: Jul 15, 2019 01:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...