Home /News /technology /

WhatsApp चं Voice Message साठीचं भन्नाट फीचर, आता युजर्सला मिळणार हा नवा ऑप्शन

WhatsApp चं Voice Message साठीचं भन्नाट फीचर, आता युजर्सला मिळणार हा नवा ऑप्शन

आता WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर लवकरच एक नवं फीचर जोडणार आहे. हे नवं फीचर व्हॉईस मेसेजबाबतचं असणार आहे. या फीचरद्वारे युजर्स App बंद केल्यानंतरही आलेला मेसेज पूर्ण ऐकू शकतील.

  नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. आता WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर लवकरच एक नवं फीचर जोडणार आहे. हे नवं फीचर व्हॉईस मेसेजबाबतचं असणार आहे. या फीचरद्वारे युजर्स App बंद केल्यानंतरही आलेला मेसेज पूर्ण ऐकू शकतील. इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp, Voice Message हे फीचर अधिक चांगलं करण्यासाठी प्रयत्न करत आहे. रिपोर्टनुसार, WhatsApp नव्या फीचरवर काम करत आहे, ज्याचं नाव ग्लोबल व्हॉईस मेसेज प्लेअर असं असेल. या फीचरचा वापर युजर्स MP3 प्लेअरप्रमाणे करू शकतात.

  WhatsApp Chat चा Look बदलणार, या मोबाईलमध्ये येणार Update!

  WhatsApp चे फीचर्स ट्रॅक करणारी वेबसाइट WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये, ग्लोबल व्हॉईस मेसेज प्लेअर फीचरच्या मदतीने युजर्स चॅट बंद करुनही व्हॉईस मेसेज ऐकू शकतात. त्याशिवाय व्हॉईस मेसेज युजर्स सहजपणे बंदही करू शकतात.

  या स्मार्टफोन्सवर बंद होणार WhatsApp, कंपनीची मोठी घोषणा

  हे फीचर अशा युजर्ससाठी अधिक फायदेशीर ठरेल, ज्यांना मोठे Voice Message येतात. हे मेसेज ऐकता-ऐकताही युजर आता दुसऱ्या चॅटवर जाऊ शकतात किंवा App बाहेरही पडू शकतात. तसंच मेसेज थांबवू शकतात किंवा बंदही करू शकतात. याधी Voice Message आल्यानंतर युजर्सला त्याच चॅटमध्ये तो ऐकावा लागत होता. आता चॅटमधून बाहेर पडूनही ते ऐकता येईल. सध्या हे फीचर टेस्टिंगमध्ये आहे. त्यानंतर लवकरच याची चाचणी पूर्ण करुन ते सर्वांसाठी लाँच केलं जाईल. हे फीचर नेमकं कधी लाँच होईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Whatsapp, Whatsapp New Feature, Whatsapp News, WhatsApp user

  पुढील बातम्या