News18 Lokmat

मोबाइल हरवल्यानंतर असं सुरक्षित ठेवा तुमचं WhatsApp Chats; होणार नाही गैरवापर

मोबाइल हरवल्यानंतर सगळ्यात पहिले तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरला कॉल करा आणि सिम कार्ड ब्लॉक करायला सांगा.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 02:50 PM IST

मोबाइल हरवल्यानंतर असं सुरक्षित ठेवा तुमचं WhatsApp Chats; होणार नाही गैरवापर

मुंबई, 21 मे : मोबाइल हरवल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगचं काय होईल याचा तुम्ही कधी विचार केला का? असं जर झालंच तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्यांच्या वापर तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी करू शकाल. कुणालाही तुमचे मॅसेज वाचता येणारी नसल्याने त्याचा गैरवापर टळेल. जाणून घ्या या ट्रिक्स..


आपलं सिम कार्ड लॉक करा - मोबाइल हरवल्यानंतर सगळ्यात पहिले तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरला कॉल करा आणि सिम कार्ड ब्लॉक करायला सांगा. असं केल्याने तुमचं व्हाट्सअॅप अकाउंट कुणालाही व्हेरिफाय करता येत नाही. तुमचं व्हॉट्सअॅप अॅक्सेस करता न आल्याने तुमचा डेटा सुरक्षित राहील.

सिम कार्ड ब्लॉक केल्यानंतर त्याच मोबाइल क्रमांकाचं नवं सीम कार्ड तुम्हाला घेता येईल, त्यानंतर परत दुसऱ्यांदा तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट अॅक्टिव्हेट करा.

एक महत्त्वाची गोष्ट लक्षातच घ्या की, एका मोबाइलवर एकाच क्रमांकावरून व्हॉट्सअॅप अॅक्टिव्हेट होतं.

Loading...

'या' कंपनीने आणलाय 16 रुपयांचा 'फिल्मी रिचार्ज प्लॅन'; 'ही' आहे ऑफर

नवं सिम कार्ड घेतल्यानंतरसुद्धा जर तुम्हाला व्हॉट्सअॅप अॅक्टिव्हेट करायचं नसेल तर support@whatsapp.com वर संबंधित बाब मेल करा. हा मेल करताना त्यात आंतरराष्ट्रीय पद्धतीप्रमाणे तुमचा मोबाइल क्रमांक लिहा. तसंच "Lost/Stolen: Please deactivate my account" असं लिहा. त्यानंतरच तुमचं व्हॉट्सअप अकाउंट डीएक्टिव्हेट होईल.

तुमची मित्रमंडळी 30 दिवसांपर्यंत तुम्हाला व्हॉट्सअॅप मॅसेज पाठवू शकतील, जे पेंडिंगमध्ये राहतील. व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट होण्याअगोदर जर तुम्ही तुमचं अकाउंट रि-अॅक्टिव्हेट केलं, तर नव्या फोनमध्ये पेंडिंग मॅसेजमध्ये तुम्लाहा ते सगळे मॅसेजेस दिसतील आणि तुम्ही परत त्या ग्रुपशी जोडले जाल.

जर तुम्ही 30 दिवसांत तुमचं व्हॉट्सअप अकाउंट एक्टिव्हेट नीही केलं तर ते पूर्णतः डिलीट होईल.

सिम कार्ड लॉक झाल्यानतंर, फोन सर्विस डिसेबल झाल्यानंतर तुम्ही ती डी-एक्टिवेट नाही केली तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते वापरलं जाऊ शकते.

व्हाट्सअॅप तुमचा फोन शोधण्याचं काम करत नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: whatsapp
First Published: May 21, 2019 02:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...