आता व्हाॅट्सअॅपवर चॅट प्रमाणेच करता येतील पैसेही ट्राॅन्सफर

आता व्हाॅट्सअॅपवर चॅट प्रमाणेच करता येतील पैसेही ट्राॅन्सफर

कंपनी या फीचरवर काम करत असून या फीचरसाठी UPI(यूनिफाइड पेमेंट इंटरफेस ट्रांझॅक्शन सिस्टिम) व्हाॅट्सअॅपच्या बीटा व्हर्जनवर देण्यात येईल अशी माहिती व्हाट्सअॅप बेटा इन्फोने दिली आहे.

  • Share this:

11 ऑगस्ट : लवकरच आता एका बँकेतील पैसे दुसऱ्या बँकेत व्हाॅट्सअॅपच्या मदतीने ट्राॅन्सफर करता येतील. कंपनी या फीचरवर काम करत असून या फीचरसाठी UPI(यूनिफाइड पेमेंट इंटरफेस ट्रांझॅक्शन सिस्टिम) व्हाॅट्सअॅपच्या बीटा व्हर्जनवर देण्यात येईल अशी माहिती व्हाट्सअॅप बेटा इन्फोने दिली आहे.

व्हाॅट्सअॅप बेटा इन्फोने दिलेल्या माहितीनुसार व्हाॅट्सअॅपच्या 2.17.295 व्हर्जनवर चालेल. सध्या तरी या फीचरचा वापर भारतातील, अमेरिकेतील ,पोलंडमधील आणि इंग्लडमधील व्हाॅट्सअॅप युजर्सनाच करता येतील. या आधी असेच फीचर्स वी चॅट आणि हाईकसारख्या अॅप्सनी दिलेले आहेत. मनी ट्राॅन्स्फर करणारं पेटीएम हे अॅप भारतात प्रसिद्ध आहे. नोटबंदीनंतर पेटिएमचा वापर भारतात कित्येक पटीने वाढला. आता या पेटीएमला टक्कर देण्यासाठी व्हाॅट्सअॅप हा नवा फीचर घेऊन येत आहे.

तर व्हाॅट्सअॅपला टक्कर देण्याच्या तयारीने आता पेटीएमही मॅसेजिंग सर्व्हिस आणते आहे ही सर्व्हिस ऑगस्ट अखेर लाँच होईल.

First published: August 11, 2017, 10:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading