• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • WhatsApp मध्ये येणार तीन नवे जबरदस्त फीचर्स; तुम्हाला होणार असा फायदा

WhatsApp मध्ये येणार तीन नवे जबरदस्त फीचर्स; तुम्हाला होणार असा फायदा

जर भारतातील एखाद्या 0123456789 या नंबरवर मेसेज करायचा असेल, तर xxxxxxxxxx च्या जागी +910123456789 टाईप करुन एंटर करावं लागेल.

जर भारतातील एखाद्या 0123456789 या नंबरवर मेसेज करायचा असेल, तर xxxxxxxxxx च्या जागी +910123456789 टाईप करुन एंटर करावं लागेल.

WhatsAppफोटो क्वालिटी, लिंक प्रीव्ह्यू, मल्टी-डिव्हाइस सपोर्ट आणि व्ह्यू वन्स या फीचर्सवर काम करत आहे. नवे फीचर्स टेस्टिंगनंतर अँड्रॉईड आणि iOS मध्ये समाविष्ट केली जातील.

  • Share this:
नवी दिल्ली, 12 जुलै : व्हॉट्सॲप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. WhatsApp अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भागच झाला आहे. कंपनी सतत आपल्या युजर्ससाठी काहीतरी नवं आणण्याच्या प्रयत्न करत असते. सध्या कंपनी अशाच नव्या फीचर्सवर काम करत आहे. या फीचर्समध्ये फोटो क्वालिटी, लिंक प्रीव्ह्यू, मल्टी-डिव्हाइस सपोर्ट आणि व्ह्यू वन्स (View Once) या फीचर्सचा समावेश आहे. नव्या फीचर्सवर काम चालू असून टेस्टिंगनंतर ती अँड्रॉईड आणि iOS मध्ये समाविष्ट केली जातील. In-App नोटिफिकेशन रिडिझाइन - WABetaInfo च्या वृत्तानुसार व्हॉट्सॲप, इन-ॲप नोटिफिकेशन अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न करत आहे. iOS 2.21.140.9 साठी व्हॉट्सॲप बीटा युजर्सना नोटिफिकेशन बॅनर, फोटोज, व्हिडिओ, जीआईएफ आणि स्टिकर याबद्दल अधिक चांगली माहिती मिळते. चॅट प्रीव्ह्यूमध्ये सुधारणा - आता चॅट प्रीव्ह्यू (Chat preview) पाहण्यासाठी युजर इन-ॲप नोटिफिकेशनचा विस्तार करू शकतात. कारण हे फीचर आता स्टॅटिक राहिलेलं नाही. नवे-जुने मेसेज पाहण्यासाठी युजर्सना केवळ स्क्रीन वर किंवा खाली स्क्रोल केली तरीही चालू शकेल. या फीचरचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे युजरने मेसेज प्रीव्ह्यू पाहिला तरीही समोरच्या म्हणजे ज्याने मेसेज पाठवला आहे त्या युजरला रीड केल्याचं समजू शकत नाही. Banking Fraud Alert! कोणत्याही Untrusted Sources वरुन डाउनलोड करू नका App View Once फीचर - व्हॉट्सॲपने बीटा ॲपमध्ये व्ह्यू वन्स (View Once) फीचर देण्यास सुरुवात केली आहे. या फीचरअंतर्गत पाठवलेले फोटो किंवा व्हिडीओ समोरची व्यक्ती फक्त एकदाच पाहू शकेल, त्या व्यक्तीने ते पाहिल्यानंतर तो मेसेज आपोआपो डिलीट होईल. पण या फीचरमध्ये पाठवलेल्या फोटो व व्हिडिओच्या स्क्रीनशॉटला ब्लॉक केलं गेलेलं नाही. काउंटरवर खरेदी केलेलं तिकीट ऑनलाईन कसं कराल कॅन्सल, असं मिळेल रिफंड व्हॉईस वेवफॉर्म (Voice Waveform) - व्हॉट्सॲप आता व्हॉईस वेव्हफॉर्म या नव्या फीचरवर काम करत आहे. त्यामुळे युजर्सना व्हॉईस मेसेज (Voice message) ऐकताना प्रोग्रेस बारच्याऐवजी व्हॉईस वेव्हफॉर्म दिसेल. सध्या हे फीचर केवळ iOS साठी तयार केलं जातंय. हे फीचर अजूनही केवळ तयार होत आहे. ते तयार झाल्यानंतर बीटा टेस्टर्सना उपलब्ध करून दिलं जाईल. या फीचर्समुळे युजर्ससाठी WhatsApp वापरणं आणखी सुकर होईल.
First published: