Whatsapp वापरताय सावधान! अकाऊंट हॅक करण्यासाठी रचलं जातंय षड्यंत्र

Whatsapp वापरताय सावधान! अकाऊंट हॅक करण्यासाठी रचलं जातंय षड्यंत्र

लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात सायबर क्राइम आणि ऑनलाइन हॅकिंगचं प्रमाण वाढत आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मे : लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं सोशल मीडिया अॅप कोणतं असेल तर whatsapp आणि facebook या दोन्ही अॅपचा वापर करून एकमेकांसोबत संवाद साधण्यापासून ते व्हिडीओ कॉलपर्यंत अगदी एकमेकांचे महत्त्वाचे डिटेल्सही आपण शेअर करत असतो. पण या लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात सायबर क्राइम आणि ऑनलाइन हॅकिंगचं प्रमाण वाढत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर आणखी एक नवीन घोटाळा समोर आला आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअॅप टेक्नॉलॉजी टीमचा अधिकृत कम्युनिकेशनचा सोर्स असल्याचं सांगून 2 स्टेप व्हेरिफिकेशनचा कोड मागत आहे. या अकाऊंटची सत्यता दाखवण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअॅपच्या प्रोफाईल फोटोचा वापर केला आहे. अशा प्रकारे होणाऱ्या फसवणुकीपासून युझर्सनी सावध राहाणं गरजेचं आहे.

व्हॉट्सअॅप कोणत्याही युझर्सला व्हॉट्सअॅप मेसेज करत नाही. कोणतीही घोषणा अथवा माहिती द्यायची असल्यास अधिकृत ट्वीट केलं जातं किंवा ब्लॉकवरून माहिती दिली जाते.

हे वाचा-परदेशातून परतली गर्भवती, हॉस्पिटलमध्ये प्रवेश न दिल्यामुळे गर्भातच दगावलं बाळ

WhatsApp चं फीचर ट्रॅक करणाऱ्या ब्लॉक WABetaInfo ने या नव्या घोटाळ्याबद्दल माहिती ट्वीट करून माहिती दिली आहे. ट्विटरच्या युजर डॅरियो नवारोने वापरकर्त्यांकडून मिळालेल्या या घोटाळ्याच्या संदेशाविषयी चौकशी केली. नवारोने सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, घोटाळेबाजानं स्पेनिशभाषेतून मेसेज पाठवण्यात आला. त्याने मोबाईल नंबर आणि व्हेरिफिकेशन कोड मागितला.

तुमच्या मोबाईलमध्ये येणारा ओटीपी, मोबाईल नंबर, टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी येणार कोड यासंबंधिची कोणतीही माहिती कुणालाही शेअर करू नका. अशा प्रकारचे येणारे मेसेज हे फेक असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

हे वाचा-लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी त्यांच्या घरात हलला होता पाळणा, पण कोरोनानं...

हे वाचा-पोलिसांमुळे 33 मजूरांचा जीव धोक्यात, तब्बल 20 तास मृतदेहासोबत केला प्रवास

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 29, 2020, 1:20 PM IST

ताज्या बातम्या