सावधान, WhatsApp युजर्ससाठी मोठा धोका, कोणीही पाहू शकतं तुमचं चॅट

सावधान, WhatsApp युजर्ससाठी मोठा धोका, कोणीही पाहू शकतं तुमचं चॅट

WhatsApp मध्ये एक गडबड दिसून आलीय. एक मिस काॅल करून फोन हँक केला जातोय.

  • Share this:

मुंबई, 14 मे : WhatsApp मध्ये एक गडबड दिसून आलीय. एक मिस काॅल करून फोन हँक केला जातोय. सूत्रांच्या माहतीनुसार युजरला एक व्हाॅटसअ‍ॅप काॅल करून त्याच्या फोनचा कॅमेरा आणि माइक हॅक केला गेला. सोबत त्याला युजर्सचा ईमेल, मेसेज, लोकेशन डेटा सर्व काही मिळालं. व्हाॅट्सअ‍ॅपनं ही झालेली गडबड सुधारली. पण WhatsApp अपडेट करणं गरजेचं आहे.  फायनॅन्शियल टाइम्सच्या बातमीनुसार तो एक बग होता. तो व्हाॅट्सअॅपच्या आॅडिओ काॅल फीचरमध्ये आला होता. WhatsAppनं हे दुरुस्त केलंय आणि  युजर्सना व्हाॅटसअ‍ॅप अपडेट ठेवायला सांगितलाय.

अमेझाॅननं आणलीय नवी संधी, 'या' अटीवर कंपनी देतेय 7 लाख रुपये

लगेच करा अपडेट - व्हाॅटसअ‍ॅपनं युजर्सना लेटेस्ट वर्जन डाऊनलोड करायला सांगितलीय. तसंच स्मार्टफोन आणि त्याचा ओएसही अपडेट करायला हवा.

सिटिझन लॅब्सच्या संशोधनावरून WhatsAppमधल्या या बिघाडाबद्दल मेमध्येच कळलं होतं. युकेमधल्या एका मानवाधिकारशी संबंधित वकिलावर हा प्रयोग झाला.

Post Office ची खास योजना, रोज 55 रुपये गुंतवून मिळेल 10 लाखांचा विमा

WhatsAppनं आपल्या सर्व युजर्सना अॅप अपडेट करायला सांगितलंय. सिक्युरिटी रिसर्चर्स आणि व्हाॅटसअ‍ॅपनंही याची खात्री दिलीय की हे स्पायवेअर इस्रायलच्या सिक्रेटिव्ह एनएसओ ग्रुपनं बनवलंय.

कोणालाही मिस काॅल देऊन त्याच्या फोनमध्ये हे घालता येतं.

युवकाचा मृत्यू; व्हिडिओ कॉलवर गर्लफ्रेंडला सांगत होता फाशी कशी घ्यायची!

नक्की काय झालं?

इस्रायलचा एनएसओ ग्रुप सरकारसाठी काम करतोय. वेगवेगळ्या प्रकारे माहिती गोळा करण्याचा प्रोग्रॅम बनवतं.

WhatsAppनं मात्र या ग्रुपचं नाव न घेता आरोप केलाय. तर एनएसओ  ग्रुपनं आपण कुठल्याही युजरच्या बाबतीत असं करत नाही, असं सांगितलंय.


VIDEO : गोडसे हा दहशतवादीच, ओवेसींकडून कमल हासनची पाठराखण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: whatsapp
First Published: May 14, 2019 04:29 PM IST

ताज्या बातम्या