'J1 झालं का?' WhatsApp वर तुमचं Private चॅट धोक्यात

WhatsApp वरून केलं जाणारं चॅटिंग सुरक्षित आहे असं वाटत असलं तरी गुगलच्या एका टीमनं बग शोधला आहे. यामुळं तुमचं चॅट कोणीही वाचू शकतं.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 02:31 PM IST

'J1 झालं का?' WhatsApp वर तुमचं Private चॅट धोक्यात

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : WhatsApp मध्ये एक बग सापडला असून याचा वापर करून हॅकर्स तुमचं प्रायव्हेट चॅट हॅक करू शकतात. गुगलच्या प्रोजेक्ट झिरो टीमनं या बगचा शोध लावला आहे. त्यांनी आयओएस युजर्सना सावध केलं आहे. मेसेज पाठवणाऱ्या कोणत्याही वेबसाइटवर क्लिक न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

व्हॉटसअॅपचे मालकी हक्क असलेल्या फेसबुकनं एंड टू एंड इनक्रिप्शनचा दाखला देत चॅट सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. मात्र, गुगल संशोधक इआन बीरने यात बग असल्याचं म्हटलं आहे. गुगलनं म्हटलं आहे की काही वेबसाइट अशा आहेत ज्या धोकादायक आहेत.

व्हॉटसअॅपच्या प्रवक्त्यांनी Tech2 च्या वेबसाइटला सांगितलं की, त्यांना युजर्सच्या प्रायव्हसीची काळजी आहे. त्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळं बग किंवा व्हायरस असण्याची शक्यता कमी आहे. आम्ही युजर्सना नेहमी अॅप अपडेट करण्यास सांगतो. कारण त्यामध्ये सेक्युरिटी अपडेट केलेले असतात.

युजर्सना त्यांचे चॅट सुरक्षित ठेवायचे असेल तर ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट ठेवावी लागेल. अपडेटेड सिस्टिममध्ये बगचा धोका कमी असतो. कोणताही संशयास्पद इमेव किंवा लिंकवर क्लिक करु नका. हॅकर्स बनावट लिंकवरून तुमचं व्हॉटसअॅप अॅक्सेस करू शकतात.

जगातील आक्रमक हेलिकॉप्टर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात, पाहा LIVE VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 02:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...