भिक्षां देहि! भारतात WhatsApp Pay सुरू झाल्यावर लोकांनी सोशल मीडियावर पाडला मिम्सचा पाऊस

भिक्षां देहि! भारतात WhatsApp Pay सुरू झाल्यावर लोकांनी सोशल मीडियावर पाडला मिम्सचा पाऊस

WhatsApp नं आयफोन आणि अँड्रॉईड युजरसाठी आपल्या WhatsApp Pay पेमेंट सेवा सुरू केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे (WhatsApp) युजर्स आता भारतात सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आता कोणत्याही दुसऱ्या व्हॉट्सअ‍ॅप युजरला यूपीआय आयडीमध्ये (UPI ID) पैसे पाठवता येणार आहेत. यूपीआय पेमेंट सर्व्हिस लाँच करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) मंजुरी मिळाली आहे. WhatsApp नं आयफोन आणि अँड्रॉईड युजरसाठी आपल्या WhatsApp Pay पेमेंट सेवा सुरू केल्या आहेत, म्हणजे आता इतर पेमेंट प्लॅटफॉर्म्ससारखं, आर्थिक व्यवहारांसाठीसुद्धा हे मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन वापरता येईल.

हे अ‍ॅप्लिकेशन युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरणार आहे, ही भारतातील 160 हून अधिक बँकांचा पाठिंबा असलेली रीअल-टाइम पेमेंट्स सिस्टम आहे. व्हॉट्सअ‍ॅप पे काही युझर्ससाठी या आधीच काही कालावधीसाठी उपलब्ध होतं.

वाचा-या ई-कॉमर्स साईटच्या 2 कोटी युजर्सचा डेटा लीक;30 लाख रुपयात विक्रीची माहिती

आता जिथे WhatsApp Pay हा Google Pay, Phonepe आणि Paytmयांना टक्कर देण्यासाठी मैदानात उतरला आहे, यावर युजरनं एकापेक्षा एक मिम्स तयार केले आहेत.

अनेकांनी यावर विनोद केले की आता इतर पेमेंट प्लॅटफॉर्म्समध्ये नोकरी करणाऱ्यांचे 'जॉब' जाणार, कारण बहुतेक लोक हे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करूनच पेमेंट्स करतील असं म्हटलंय.

वाचा-घरबसल्या कमाईची सुवर्णसंधी देतंय YouTube! वाचा काय आहे प्रक्रिया

काहींनी हेराफेरी चित्रपट, रामायण टीव्ही मालिका यातील सीनचा वापर मीम्समध्ये केला आहे. व्हॉट्सअप आता गुगल पे किंवा इतर पेमेंट अपना What’s up? म्हणजे काय कसं काय चाललंय? असं विचारतंय असंही एकाने ट्विट केलंय.

वाचा-WhatsApp न उघडताही पाहता येणार कोण आहे ऑनलाइन, ही आहे ट्रिक

WhatsApp Pay सर्व्हिस नेमकं आहे काय?

WhatsApp Pay चं भारतात गेल्या दोन वर्षांपासून बीटा टेस्टिंग सुरू आहे. पेमेंट प्रक्रियेत येणाऱ्या काही अडचणींमुळे भारतात WhatsApp Pay अद्याप अधिकृतपणे लाँच करण्यात आलेलं नाही. पण आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅप पे भारतात लाँच होणार आहे. ही सर्व्हिस यूपीआयवर (UPI)आधारित आहे. ही सर्व्हिस सुरू झाल्यानंतर युजर्सला कधीही आणि कुठेही पैसे पाठवता येणार आहेत.

असं वापरा WhatsApp Pay

whatsapp ओपन करून स्क्रिनवर उजव्या हाताला, टॉपला तीन डॉट असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा. तेथे Payments ऑप्शनवर जा आणि Add payment method वर टॅप करा. तेथे विविध बँकांचे ऑप्शन मिळतील. बँकेचं नाव सिलेक्ट करा, त्यानंतर बँकेला लिंक असलेल्या मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेशन होईल. त्यासाठी SMS द्वारे व्हेरिफाय करण्याच्या पर्यायावर क्लिक करा. यावेळी युजरने त्याचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि बँक अकाउंटशी लिंक असलेल्या नंबर सारखा असल्याची खात्री करा. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर, UPI पिन जेनरेट करावा लागेल. त्यानंतर WhatsApp Pay वर ट्रान्झेक्शन करण्यासाठी, ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्याचं चॅट ओपन करा, आणि अटॅचमेंट आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर Payment वर टॅप करा आणि किती रक्कम पाठवायची आहे, ती एंटर करा. त्यानंतर UPI टाकून, पेमेंट होईल आणि याचा कन्फर्मेशन मेसेजही येईल.

Published by: Priyanka Gawde
First published: November 11, 2020, 4:06 PM IST
Tags: whatsapp

ताज्या बातम्या