नवी दिल्ली, 15 जानेवारी : व्हॉट्सॲपची (WhatsApp) नवी प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. जर युझर्सनी (Users) ही पॉलिसी स्वीकारली नाही तर त्यांचे अकांऊट आपोआपच बंद होईल, असे व्हॉट्सॲपने सांगितले आहे. नव्या पॉलिसीनुसार व्हॉट्सॲप आपल्या युझर्सचा इंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस फेसबुक(Facebook) , इन्स्टाग्राम (Instagram) किंवा अन्य थर्ड पार्टीला देऊ शकतो. यामुळे युझर्स नाराज असून ते टेलिग्राम (Telegram) किंवा सिग्नल अॅपकडे (Signal App) वळत आहेत. यावर व्हॉट्सॲपने म्हटले आहे की, ‘आम्ही आमची प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली होती. अपडेटेड पॉलिसीच्या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, तसेच चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे आम्हाला अनेक लोकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना अनुसरुन आम्ही काही स्पष्टीकरण देऊ इच्छितो. युझर्स एकमेकांशी खासगीत कनेक्टेड राहवेत यासाठी आम्ही व्हॉट्सॲपची निर्मिती खूप मेहनतीने केली आहे.’
याबाबत व्हॉट्सॲपने नुकतेच Tweet केलं आहे. त्यात कॉलिंग, प्रायव्हेट चॅट, ग्रुप चॅट, कॉन्टॅक्ट आणि डेटाविषयीच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. त्यात व्हॉट्सॲप लोकांच्या मेसेज आणि कॉलिंगचे रेकार्ड ठेवत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच युझर्सने शेअर केलेल्या लोकेशनचा तपशील ना व्हॉट्सॲप पाहू शकते ना त्याचा एक्सेस फेसबुककडे आहे. युझर्सने शेअर केलेला लोकेशनचा तपशील हा गुप्त राहतो. ग्रुप चॅटच्याबाबतही असेच असते, असे व्हॉट्सॲपने व्टिटमध्ये म्हटले आहे.
तुमचे कान्टॅक्ट Whatsapp शेअर करत नाही
व्हॉट्सॲप युझर्सचे कोणतेही काँटॅक्ट अगदी फेसबुकसोबतही शेअर केले जात नसल्याचे व्हॉट्सॲपने म्हटले आहे. तसेच नव्या प्रायव्हसी पॉलिसीत युझर्सचे व्हॉट्सॲप ग्रुप प्रायव्हेटच राहतील असे स्पष्टीकरण ग्रुप इन्व्हाईटबाबत व्हॉट्सॲपने दिले आहे. तसेच युझर्स अजूनही ग्रुप डिसअॅपीयरचे फिचर सेट करु शकतात. तसेच डाटा देखील डाऊनलोड करु शकतात, असे व्हॉट्सॲपने म्हटले आहे. गतवर्षी हे फिचर व्हॉट्सॲपने आणले होते. यानुसार 7 दिवसांनंतर कोणताही मेसेज आपोआपच डिलीट होत होता. यालाच त्यांनी डिसअॅपीअर मेसेजिंग असे नाव दिले आहे. मात्र व्हॉट्सॲपने युझर्सला डेटा डाऊनलोड करण्यासाठी पर्याय देखील दिला आहे.
Tweet ला उत्तर देताना व्हॉट्सॲपने म्हटलं आहे की, कंपनीच्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे मित्र आणि कुटुंबीयांसोबत युझर्सने केलेल्या चॅटच्या प्रायव्हसीवर कोणताही परिणाम होत नाही. व्हॉट्सॲपने मागील आठवड्यात आपल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीविषयी स्पष्टीकरण देताना सांगितले की ही नवी पॉलिसी युझर्स बिझनेस अकांऊटसोबत कसे कम्युनिकेट करतात आणि त्याचा त्यांच्या खासगी संवादावर काही परिणाम होत नाही ना याबाबत माहिती घेण्यासाठी आहे.
या नवीन पॉलिसी अपडेटचा कोणताही परिणाम युझर्सचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांच्या खासगी मेसेजेसवर होणार नसल्याचे व्हॉट्सॲपने म्हटले आहे. या पॉलिसी अपडेटमध्ये कोणते बदल होणार आहे ते नमुद करण्यात आले असून त्यात एखाद्या व्यवसायाविषयी मेसेज पाठवणे, जे की ऑप्शनल आहे. तसंच त्यात डेटा कसा वापरायचा आणि एकत्रित करायचा हे स्पष्टपणे म्हटले आहे.
आपले खासगी आणि सुरक्षित मेसेजिंग
फेसबुक किंवा व्हॉट्सॲप तुमचे खासगी मेसेज वाचू शकत नाहीत की तुमचे कॉल्स ऐकू शकत नाहीत. त्यामुळे निर्धास्त राहा. युझर्स आपल्या मित्रांना, कुटुंबातील सदस्य तसेच सहकाऱ्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवतात किंवा त्यांच्याशी कॉल्सवर संवाद साधतात. मात्र हे मेसेज व्हॉट्सॲप किंवा फेसबुक वाचू शकत नाही. तसेच कॉल्सही ऐकू शकत नाही. व्हॉट्सॲपच्या म्हणण्यानुसार, युझर्स व्हॉट्सॲपवर मित्र किंवा नातेवाईक तसेच सहकाऱ्यांसोबत जे काही शेअऱ करतो ती गोष्ट त्या दोघांपर्यंतच मर्यादित राहते. कारण युझर्सचे खाजगी मेसेज एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनमुळे सुरक्षित राहतात. व्हॉट्सॲप या सुरक्षेत कोणतीही कमतरता ठेवणार नाही. व्हॉट्सॲप एन्क्रिप्शनला अधिक महत्व देतो. त्यामुळे प्रत्येक चॅटवर असलेले एन्क्रिप्शनचे लेबल युझर्स पाहू शकतात.
व्हॉट्सॲप कोण कोणाला कॉल्स किंवा मेसेज करतोय याचे रेकॉर्ड ठेवत नाही : पूर्वी मोबाईल कंपन्या आणि ऑपरेटर्स याबाबत माहिती स्टोअऱ करुन ठेवत होते. मात्र अशी माहिती स्टोअर करणे व्हॉट्सॲपसाठी शक्य नाही. 200 कोटी युझर्सचे रेकॉर्ड ठेवल्यास प्रायव्हसी आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टी धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे व्हॉट्सॲप असे करीत नाही.
फेसबुक किंवा व्हॉट्सॲप शेअर केलेले लोकेशन पाहू शकत नाही : जेव्हा युझर्स व्हॉट्सॲपवर लोकेशन शेअर करतात, तेव्हा ते एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनमुळे सुरक्षित होते. याचा अर्थ असा की युझर्सने शेअर केलेले लोकेशन हे फक्त त्याने ज्यांच्या सोबत शेअर केले आहे त्याच व्यक्ती पाहू शकतात अन्य कोणीही नाही.
फेसबुकसोबत कॉन्टॅक्ट लिस्ट शेअर केली जात नाही: युझर्सने परवानगी दिल्यानंतरच व्हॉट्सॲप फोनच्या अॅड्रेस बुकमधील केवळ फोन क्रमांकच अॅक्सेस करतो. तुमच्या संपर्कातील व्यक्तींशी तुम्हाला सहजतेने संवाद साधता यावा, यासाठी हा अॅक्सेस केला जातो. व्हॉट्सॲप ही माहिती फेसबुक अॅपसोबत शेअर करीत नाही.
व्हॉट्सॲप ग्रुप खासगी आहेत : व्हॉट्सॲप मेसेजेस पाठवण्यासाठी आणि आपली सेवा स्पॅमपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रुप मेंबरशिपचा वापर केला जातो. व्हॉट्सॲप हा डेटा फेसबुकसोबत शेअर करीत नाही. या प्रायव्हेट चॅट एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असतात. त्यामुळे आम्हाला समजू शकत नाही की ग्रुपवर काय संवाद सुरु आहे.
आपोआप गायब होणारा मेसेजचा मोड वापरणे आहे शक्य : अधिक सुरक्षितता हवी असल्यास युझर्स कोणताही मेसेज पाठवल्यानंतर तो 7 दिवसांनी गायब होण्याचा पर्याय निवडू शकतात. यात तुम्ही तुमचा डाटा डाऊनलोड करु शकता. युझर्स अपमध्ये डाटा डाऊनलोड करुन पाहू शकतात व्हाटसअप जवळ तुमच्या अकांऊटबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध नसते.
व्हॉट्सॲप, सिग्नल आणि टेलिग्राम, कोण किती डेटा वापरतो?
एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन (End To End Encryption) : व्हॉट्सॲप युझर्सची चॅट ही एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आहे. तसेच सिग्नममध्ये ही चॅट एन्क्रिप्टेड असते. टेलिग्राममध्ये फक्त खासगी चॅट आणि सर्व चॅट एन्क्रिप्टेड असतात.
डिसअॅपरिंग मेसेजेस (Disappearing Messages) : व्हॉट्सॲपमध्ये मेसेज डिसअॅपरिंग करण्याची सुविधा आहे. अशीच सुविधा टेलिग्राम आणि सिग्नलमध्ये देखील आहे.
चॅट बॅकअप (Chat Backup) : व्हॉट्सॲपमध्ये चॅट बॅकअपचा पर्याय उपलब्ध आहे मात्र तो थर्ड पार्टीवर अवलंबून आहे. सिग्नल अपमध्ये हा पर्याय उपलब्ध नाही. यावर लोकल टाईसवर चॅटस स्टोअर होते. टेलिग्राममध्ये चॅट बॅकअपचा पर्याय उपलब्ध आहे मात्र तो टेलिग्राम क्लाऊडवरच उपलब्ध होतो.
स्क्रिन लाॅक (Screen Lock) : व्हॉट्सॲपमध्ये हे फिचर उपलब्ध असून, टेलिग्राम, सिग्नलमध्ये हे फिचर उपलब्ध नाही.
अॅडव्हरटाईजमेंट (Advertisement) : व्हॉट्सॲप आणि सिग्नलवर हे फिचर नाही. मात्र टेलिग्रामवर लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
ग्रुप चॅट सिक्युरिटी (Group Chat Security) : व्हॉट्सॲपमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. तसेच ती एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहे. सिग्नलमध्ये ही सुविधा अशीच काम करते तर टेलिग्राममध्ये ही सुविधा नाही.
व्हिडीओ, व्हॉईस कॉल्स (Video, Voice Calls) : व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नलमध्ये हे फिचर उपलब्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp