कितीही जुने मेसेज शोधा एका मिनिटात, Whatsapp वर लवकरच उपलब्ध होणार हे फिचर

कितीही जुने मेसेज शोधा एका मिनिटात, Whatsapp वर लवकरच उपलब्ध होणार हे फिचर

आजच्या काळात संवाद साधण्याचं सर्वोत्तम माध्यम म्हणून या App कडे पाहिलं जातं.

  • Share this:

मुंबई, 12 जून : भारतात सर्वात जास्त मेसेज आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी जास्त वापरलं जाणारं माध्यम म्हणजे व्हॉट्सअॅप (Whatsapp) आहे. Whatsapp सातत्यानं युझर्ससाठी नवीन फिचर्स आणि सिक्युरिटी फिचर्स लाँच करत असतं. आजच्या काळात संवाद साधण्याचं सर्वोत्तम माध्यम म्हणून या App कडे पाहिलं जातं. बऱ्याचदा आपल्याला जुन्या मेसेजचा संदर्भ हवा असतो तेव्हा तो मिळत नाही अशावेळी तो शोधणं अधिक कठीण होऊन जातं. यासाठी कंपनीकडून खास फिचर्स लाँच करण्यात येणार आहे.

लवकरच आपल्याला तारखेनुसार मेसेज शोधता येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. सध्या या फिचरवर टेस्टिंग सुरू असून सर्वात पहिल्यांदा हे फिचर आयफोन आणि त्यानंतर android फोनसाठी लाँच करण्यात येणार आहे.

wabetainfo ने दिलेल्या वृत्तानुसार या फिचरवर सध्या काम सुरू आहे. या फिचरचं टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर युझर्सला याचा लाभ घेता येणार आहे. आधी Apple आणि त्यानंतर Android फोनमध्ये उपलब्ध होणार आहे.

एका कॅलेंडर आयकॉनला Whatsappसोबत जोडण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्याला हे अॅप वापरताना कॅलेंडर आयकॉन दिसेल. या कॅलेंडरच्या मदतीनं तुम्ही कितीही जुने मेसेज एकदी एका मिनिटात शोधू शकणार आहात. तुम्हाला तारीख निवडायची आहे. त्या तारखेला तुम्ही कोणाशी आणि काय बोललात याचे तपशील पाहता येणार आहेत.

हे वाचा-तुम्हाला कळलंच नाही, 6 दिवसांत हळूहळू इतकं महाग झालं पेट्रोल

हे वाचा-कोरोनाच्या संकटात RBIकडून आणखी एका बँकेवर कारवाई, ग्राहकांना पैसे काढण्यास बंदी

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 12, 2020, 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading