नवी दिल्ली, 14 जून: WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी नव्या फीचर्सवर सतत काम करत असतं. आतापर्यंत व्हॉट्सअॅपने अनेक फीचर्स लाँच केले आहेत. आता WhatsApp आपल्या युजर इंटरफेसमध्ये (UI) बदल करणार असल्याची माहिती आहे.
एका रिपोर्टनुसार, WhatsApp आपल्या अॅपच्या UI मध्ये अँड्रॉईड युजर्ससाठी बदल करणार आहे. WaBetaInfo च्या रिपोर्टनुसार, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म चॅट सेल्सदरम्यान असलेल्या सेपरेटर लाईन्स हटवणार असल्याची माहिती आहे.
WaBetaInfo एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. यात WhatsApp वर लेटेस्ट आणि आगामी येणाऱ्या फीचर्सबाबत सांगितलं जातं. अँड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठीचे अपडेट यावर शेअर केले जातात. रिपोर्टमध्ये व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटबाबत एक स्क्रिनशॉटही देण्यात आला आहे.
स्क्रिनशॉटमध्ये दाखवण्यात आलं आहे, की ज्यावेळी हे फीचर लाँच केलं जाईल, त्यावेळी नवं चॅट कसं दिसेल. आता WhatsApp Chat एका लाईनद्वारे सेपरेट केले जातात. नवं अपडेट आल्यानंतर दोन चॅटमधल्या लाईन्स हटवल्या जातील.
WhatsApp is bringing small UI changes on Android!
WhatsApp is removing all line separators between the chat cells on WhatsApp for Android.https://t.co/EgOeP2i7Z2 — WABetaInfo (@WABetaInfo) June 11, 2021
Android युजर्ससाठी WhatsApp चं हे अपडेट बीटा वर्जनमध्ये उपलब्ध आहे. iPhone युजर्ससाठी हे अपडेट कधी उपलब्ध होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, WhatsApp chats, Whatsapp New Feature, Whatsapp News