मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp ने लाँच केले दोन खास फीचर्स; असा होणार फायदा

WhatsApp ने लाँच केले दोन खास फीचर्स; असा होणार फायदा

नव्या अपडेट्समुळे लोकांना आपल्या गरजेच्या कोणत्या वस्तू उपलब्ध आहे हे तत्काळ समजू शकणार आहे, तर व्यावसायिकांना व्हॉटसॲप फॉर बिझनेसच्या (WhatsApp For Business) माध्यमातून आपलं उत्पादन लवकरात लवकर विक्री करणं शक्य होणार आहे.

नव्या अपडेट्समुळे लोकांना आपल्या गरजेच्या कोणत्या वस्तू उपलब्ध आहे हे तत्काळ समजू शकणार आहे, तर व्यावसायिकांना व्हॉटसॲप फॉर बिझनेसच्या (WhatsApp For Business) माध्यमातून आपलं उत्पादन लवकरात लवकर विक्री करणं शक्य होणार आहे.

नव्या अपडेट्समुळे लोकांना आपल्या गरजेच्या कोणत्या वस्तू उपलब्ध आहे हे तत्काळ समजू शकणार आहे, तर व्यावसायिकांना व्हॉटसॲप फॉर बिझनेसच्या (WhatsApp For Business) माध्यमातून आपलं उत्पादन लवकरात लवकर विक्री करणं शक्य होणार आहे.

    नवी दिल्ली, 8 एप्रिल :व्हॉटसॲप (WhatsApp) सातत्यानं आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेटस आणत असतं. बुधवारी व्हॉटसॲपने ई-कॉमर्ससाठी (E-Commerce) दोन नव्या अपडेटसची घोषणा केली आहे. या नव्या अपडेट्समुळे लोकांना आपल्या गरजेच्या कोणत्या वस्तू उपलब्ध आहे हे तत्काळ समजू शकणार आहे, तर व्यावसायिकांना व्हॉटसॲप फॉर बिझनेसच्या (WhatsApp For Business) माध्यमातून आपलं उत्पादन लवकरात लवकर विक्री करणं शक्य होणार आहे. तसंच आता व्यावसायिकांना केवळ मोबाईलच नव्हे, तर व्हॉटसॲप वेब किंवा डेस्कटॉपच्या माध्यमातून कॅटलॉग तयार करणं आणि त्याचं मॅनेजमेंट करणं शक्य होणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

    याबाबत व्हॉटसॲपने म्हटलं आहे, की बऱ्याच कंपन्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्यांच्या यादीचं व्यवस्थापन करत असतात. मात्र आता हा नवा पर्याय नवीन वस्तू किंवा सेवा यांना जोडण्यासाठी वेगवान आणि सुलभ ठरेल, जेणेकरुन ग्राहकांना देखील कोणत्या वस्तू उपलब्ध आहेत हे सहजपणे समजू शकेल.

    (वाचा - Aadhaar Card वरचा फोटो आवडला नाही? असा करा अपडेट)

    व्हॉटसॲपचं हे अपडेट एखादं रेस्टॉरंट किंवा एखाद्या कापड दुकानासारख्या मोठ्या फर्मसाठी उपयुक्त ठरेल. जेणेकरुन अशा फर्म आपल्या कडील मालाची सूची एका मोठ्या स्क्रिनवर लावू शकतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांचे जगभरात 80 लाखांपेक्षा अधिक व्यावसायिक कॅटलॉग (BusinessCatalog) अस्तित्वात आहेत. त्यात भारतातील 10 लाख कॅटलॉगचा समावेश आहे. लोकांना कॅटलॉग ब्राऊज करता यावं, एकापेक्षा अधिक उत्पादनं खरेदी करता यावीत आणि याबाबतचा संदेश कंपनीला पाठवता यावा यासाठी कंपनीने गेल्या वर्षी व्हॉटसॲपवर कार्ट आणलं होतं.

    आता नव्या अपडेटनुसार त्यांना कॅटलॉगमधील काही वस्तू हाईड (Hide) करण्याचा म्हणजेच लपवण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला जात आहे. तसंच जेव्हा एखादी वस्तू स्टॉकमध्ये पुन्हा येईल तेव्हा ती ग्राहकांना परत उपलब्ध करुन दिली जाईल आणि या सर्व बाबी सहजपणे पाहता देखील येणार आहेत.

    (वाचा - तुमच्या गैरहजेरीत तुमचा फोन कोणी वापरला? क्षणात असा लावला शोध)

    हे फीचर झालंय सुरू

    हे फीचर जगभरातील व्यापाऱ्यांसाठी आता सुरू करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार,भारतातील 76 टक्के वयस्कर नागरिकांनी असं म्हटलं आहे, की मला मेसेजद्वारे संपर्क साधू शकणाऱ्या कंपनीबरोबर व्यवसाय करणं किंवा खरेदी करणं अधिक सोपं वाटतं.

    First published:
    top videos

      Tags: Whatsapp, WhatsApp features