Home /News /technology /

काय सांगता? WhatsApp कॉलही करता येणार रेकॉर्ड; 'ही' साधी ट्रिक वापरा !

काय सांगता? WhatsApp कॉलही करता येणार रेकॉर्ड; 'ही' साधी ट्रिक वापरा !

whatsapp

whatsapp

आता तुम्हाला तुमचे WhatsApp कॉल रेकॉर्ड करता येणार आहेत. काही साध्या सेटिंग करुन तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅपही रेकॉर्ड करू शकता.

    मुंबई 17 ऑगस्ट: तुमचं एखादं महत्वाचं संभाषण तुम्हाला परत ऐकायचं आहे. पण ते संभाषण व्हॉट्सअ‍ॅपने कॉल (WhatsApp Call) वरुन झाल्यामुळे तुम्हाला मिळालं नाही? आता अशी वेळ पुन्हा येणार नाही. कारण, आता तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपचे कॉलही रेकॉर्ड करणं सहज शक्य आहे. अ‍ँड्रॉईड (Android) आणि आयफोन (Iphone) युझर्सना व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड शक्य आहे. व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करताना ज्या व्यक्तीचा कॉल तुम्ही रेकॉर्ड करत आहात. त्याला याची पूर्वकल्पना देणं आवश्यक आहे. अँड्रॉईड युझर्ससाठी कॉल रेकॉर्ड करण्याची पद्धत अ‍ँड्रॉईड युझर्सना व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर त्यांना क्यूब कॉल अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल. क्यूब कॉल रेकॉर्डर अ‍ॅप सुरू करुन त्याच्या सेटिंग्जमध्ये जावं लागेल आणि वॉईस कॉल यामध्ये जाऊन Force Voip वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करायचा आहे त्याला व्हॉट्सअ‍ॅपवरुन कॉल कॉल करायचा आहे. यावेळी तुम्हाला क्यूब कॉल रेकॉर्डर सुरू असलेला दिसेल. याचा अर्थ तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. पण या सेटिंग्ज करुन सुद्धा तुमचा कॉल रेकॉर्ड होत नसेल तर तुमच्या फोनमध्येच ही सेवा उपलब्ध नाही हे समजून घ्या. आयफोन युझर्सनी कशाप्रकारे कॉल रेकॉर्ड करावा? तुम्ही आयफोन युझर असाल आणि तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर तुम्हाला लाईटनिंग केबलने MaC कनेक्ट करावा लागेल. त्यानंतर तुमच्या आयफोनवर Trust This Computer असा पर्याय येईल. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला Quick Time हा पर्याय सुरू करावा लागेल. त्याध्ये फाईल सेक्शनमध्ये जाऊन न्यू ऑडिओ रेकॉर्डिंग हा पर्याय निवडावा लागेल. रेकॉर्ड बटणाच्या खाली दाखवणारा अ‍ॅरो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि आयफोन हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर क्विक टाईममध्ये जाऊन रेकॉर्ड बटणावर क्लिक करायचं आहे. आणि तुमचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल सुरू करायचा आहे. त्यानंतर युझर आयकॉन अ‍ॅड करायचा आहे. कॉलरील संभाषण सुरू झाल्यावर रेकॉर्डिंग सुरू होईल. संभाषण संपल्यावर रेकॉर्डिंग बंद करायचं आहे आणि रेकॉर्डेड फाईलला मॅकमध्ये सेव्ह करायचं आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Whatsapp, WhatsApp features

    पुढील बातम्या