मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp चं नवं फीचर; मेसेज Seen झाल्यानंतर आपोआप होणार गायब, वाचा या भन्नाट अपडेटबाबत

WhatsApp चं नवं फीचर; मेसेज Seen झाल्यानंतर आपोआप होणार गायब, वाचा या भन्नाट अपडेटबाबत

WhatsApp च्या या फीचरमुळे मेसेज मिळालेला व्यक्ती तो मेसेज केवळ एकदाच पाहू शकतो. फेसबुकचे फाउंडर मार्क जुकरबर्ग यांनी नुकतंच या फीचरबाबत माहिती दिली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 1 जुलै : फेसबुकच्या मालकीचं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या प्लॅटफॉर्मवर विविध फीचर्स लाँच करत असतं. आता व्हॉट्सअ‍ॅपने व्ह्यू वन्स (View Once) फीचर लाँच केलं आहे. या फीचरमुळे मेसेज पाहून झाल्यानंतर, Seen झाल्यानंतर आपोआप गायब होईल. या फीचरमुळे मेसेज मिळालेला व्यक्ती तो मेसेज केवळ एकदाच पाहू शकतो. फेसबुकचे फाउंडर मार्क जुकरबर्ग यांनी नुकतंच या फीचरबाबत माहिती दिली आहे.

असं करेल काम -

WABetaInfo रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपचं हे फीचर आता केवळ बीटा युजर्ससाठी जारी करण्यात आलं आहे. WABetaInfo द्वारा शेअर करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटनुसार, युजर फोनच्या गॅलरीमधून डिसअपियरिंग फोटो पाठवू शकतात. यासाठी फोटो सिलेक्ट केल्यानंतर युजरला वॉच आयकॉनवर टॅप करावं लागेल. फोटो सेंड करताना कॅप्शन बारजवळ हा पर्याय दिसेल.

(वाचा - आता WhatsApp च्या डेटा बॅकअप घेण्याच्या पद्धतीत होणार बदल, पाहा काय होणार परिणाम)

एकदा पाहिल्यानंतर गायब होणार फोटो आणि व्हिडीओ -

या फीचरद्वारे फोटो किंवा व्हिडीओ शेअर केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीकडे हे पाहण्यासाठी एकच संधी असेल. मेसेज पाठवणारा व्यक्ती, मेसेज डिलीव्हर झाला की नाही, समोरच्या व्यक्तीने पाहिला का आणि मेसेज ओपन केला की नाही हे पाहू शकेल.

(वाचा - OK Google बोलल्यानंतर कंपनीचे कर्मचारी ऐकतात तुमचं बोलणं, गुगलचा मोठा खुलासा)

एकदाच पाहण्याच्या मर्यादेमध्ये मेसेज रिसिव्ह करणारा आलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉटही घेऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवणाऱ्याला याबाबत माहिती मिळणार नाही, कारण यात स्क्रीनशॉटची ओळख करण्याचं सिस्टम अद्याप नाही.

दरम्यान, अँड्रॉईड (Android) युजर्ससाठी चॅट बॅकअप सिस्टममध्ये (Backup) काही बदल होणार आहेत. या बदलामुळे व्हॉट्सअ‍ॅप, स्टेटस अपडेटचा (WhatsApp Status) बॅकअप घेणं बंद करेल. WaBetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं, की हे नवे बदल सध्या Android च्या बीटा वर्जनसाठी WhatsApp चा एक भाग आहेत.

First published:

Tags: Tech news, Whatsapp chat, Whatsapp New Feature, Whatsapp News