युजर्स WhatsAppच्या या फीचरचीच बघत होते वाट, 'हा' आहे त्याचा उपयोग

युजर्स WhatsAppच्या या फीचरचीच बघत होते वाट, 'हा' आहे त्याचा उपयोग

WhatsAppनं गेल्या वर्षी Vacation नावाच्या फीचरची घोषणा केली होती. ते आता बिटा व्हर्जनमध्ये आणलंय. जाणून घ्या त्याबद्दल -

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : WhatsApp चे नवे फीचर्स मोड आणि बिटा व्हर्जनमध्ये आहेत. कंपनी जवळजवळ रोजच युजर्ससाठी नवी फीचर्स घेऊन येतेय. WhatsAppनं गेल्या वर्षी Vacation नावाच्या फीचरची घोषणा केली होती. ते आता बिटा व्हर्जनमध्ये आणलंय. याचा वापर युजर्स बीटा 2.19.101 व्हर्जनमध्ये करतील. या फीचरचं टेस्टिंग Vacation Mode नावानं केलं जात होतं. आता ते ‘Ignore Archived chats’ नावानं आणलंय.

कसं काम करतो Ignore Archived chats?

या फीचरचा उपयोग करण्यासाठी युजरला व्हाॅटसअॅप सेटिंगमध्ये जावं लागेल. तिथे Notification चा पर्याय मिळेल. तिथे जाऊन Ignore Archived chats  सुरू करता येईल.

या अॅपमुळे युजरला कुठल्या चॅटचं नोटिफिकेशन नको असेल तर ते Ignore Archived chats करू शकतात. त्यामुळे नवा मेसेज आपोआप अनअर्काइव्ह होईल. याचा फायदा अशा युजर्सना होईल ज्यांना वारंवार नोटिफिकेशन येतं.

Ignore Archived chats आणि Archiveचॅटमध्ये काय आहे फरक?

सध्या व्हाॅट्सअॅप युजर्सच्या अर्काइव्ह चॅटमध्ये नवा मेसेज येतो, तेव्हा चॅट आपोआप अनअर्काइव्ह होतं. चॅट अनअर्काइव्ह झालं की चॅट मुख्य चॅट लिस्टमध्ये दिसायला लागतं.

व्हाॅटसअॅपच्या या फीचरमुळे युजर्सच्या अर्काइव्ह चॅटमध्ये जाणारा मेसेज अर्काइव्ह म्हणून असेल. युजर्स जोपर्यंत त्याला Unarchive करत नाही तोपर्यंत तो चॅट्सच्या मेन मेन्यूमध्ये दिसणार नाही. Ignore Archived chats सेटिंगमध्ये असेल. Archiveचॅट मेन मेन्यूमध्ये असेल.

हल्ली व्हाॅटसअॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे कंपनी त्यात वेळोवेळी सुधारणा करतेय.

First published: April 13, 2019, 5:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading