मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp चं बेस्ट अपडेट! लिंकवर क्लिक करुन कॉलमध्ये होता येईल सहभागी

WhatsApp चं बेस्ट अपडेट! लिंकवर क्लिक करुन कॉलमध्ये होता येईल सहभागी

QR Code सह WhatsApp Account वेरिफाय करा. डाव्या बाजूला तीन डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर Settings वर क्लिक करा.

QR Code सह WhatsApp Account वेरिफाय करा. डाव्या बाजूला तीन डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर Settings वर क्लिक करा.

कंपनी एका अशा फीचरचं टेस्टिंग करतंय, ज्यामध्ये युजर्सना WhatsApp वर सुरू असलेल्या कॉलमध्ये सामील होण्यासाठी लिंकच्या माध्यमातून अ‍ॅड होण्याची परवानगी दिली जाईल.

    मुंबई, 01 मार्च: व्हॉट्सअ‍ॅप हा बहुतांश (WhatsApp Latest News) सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी अनेक नवनवीन फीचर्स आणत असतं. परिणामी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp Update) फीचर्समध्ये अनेक बदल होत असतात. आणि नवनवीन फीचर्सची त्यात भर पडत असते. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅपमध्ये (WhatsApp New Features) काही नवीन फीचर्स अ‍ॅड केले जाणार आहेत.

    WhatsApp युजर्सचा अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. कंपनीने नुकतंच नवीन सर्च ऑप्शन आणि मेसेज रिअ‍ॅक्शन (WhatsApp Message Reaction) ही काही फीचर्स आणली आहेत. ही फीचर्स लवकरच अ‍ॅपमध्ये अपडेट केली जातील. यासोबतच WhatsApp आणखी एका महत्वाच्या फीचरवर काम करत आहे, जे लवकरच युजर्ससाठी आणलं जाऊ शकतं. कंपनी एका अशा फीचरचं टेस्टिंग करतंय, ज्यामध्ये युजर्सना WhatsApp वर सुरू असलेल्या कॉलमध्ये सामील होण्यासाठी लिंकच्या माध्यमातून अ‍ॅड होण्याची परवानगी दिली जाईल. यापूर्वी, व्हॉट्सअ‍ॅपने कॉल सुरू केल्यानंतर त्यात सामील होण्याची सुविधा आणली होती. आता, ते होस्टला व्हॉट्सअ‍ॅप कॉलसाठी (WhatsApp Call) लिंक तयार करण्याची आणि इतर युजर्सना कॉलसाठी आमंत्रित करण्याची सुविधा देईल.

    हे वाचा-Smartphone कसं ठरवतो युजरला स्क्रिनवर कधी Brightness ची गरज आहे आणि कधी नाही?

    हे फीचर आधीच मेसेंजर रूमवर उपलब्ध आहे. दोघांमधील फरक एवढाच आहे की मेसेंजर रूममध्ये कोणीही सामील होऊ शकतं, अगदी फेसबुक वापरत नसणारेही. परंतु व्हॉट्सअ‍ॅप कॉल्समध्ये केवळ व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट असलेल्या किंवा अ‍ॅप वापरणाऱ्या युजर्सना सहभागी होता येईल. रिपोर्टनुसार, हे फीचर सध्या डेव्हलपमेंटमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही सध्या कॉल लिंक तयार करू शकत नाही, परंतु कंपनी येत्या अपडेटमध्ये हे फीचर अ‍ॅड करण्यासाठी काम करत आहे.

    कॉल लिंक फीचर कसं काम करणार?

    हे अपडेट सर्वप्रथम Wabetainfo ने शेअर केलं होतं. त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅप लवकरच युजर्सना कॉल लिंक (call link) वापरून चालू कॉल जॉईन करणं सोपं करणार आहे. होस्ट त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये लिंक तयार करू शकेल, नंतर तो इतर युजर्ससोबत शेअर करू शकेल. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या युजर्ससोबतदेखील लिंक शेअर केली जाऊ शकते. महत्वाचं म्हणजे ही लिंक वापरून WhatsApp वर कॉल करण्यासाठी युजर्सकडे अकाउंट नसल्यास त्यांना WhatsApp वर अकाउंट तयार करावं लागेल. कारण व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह सुरक्षित असतात.

    हे वाचा-Top 10 Apps : ‘या’ 10 अ‍ॅप्सवर लोकांनी 2021 मध्ये खर्च केले सर्वाधिक पैसे

    WhatsAppवर येणार आणखी नवी फीचर

    याशिवाय अनेक फीचर्सवर अ‍ॅप काम करत आहे. यात नवीन सर्च मेसेज शॉर्टकटचा समावेश आहे. याशिवाय, मेसेज रिअ‍ॅक्शन फीचर अ‍ॅपच्या डेस्कटॉप बीटावर पुन्हा दिसले आहे. यासह, अ‍ॅप लवकरच युजर्सना इमोजी वापरून मेसेजवर प्रतिक्रिया देण्याची सुविधा देणार आहे. या फीचरमध्ये यूजर्सना एका मेसेजला रिप्लाय देण्यासाठी सहा इमोजी  पर्याय दिले जातील. ज्यातून ते स्वतःच्या आवडीचा इमोजी निवडू शकतील.

    दरम्यान, हे फीचर्स सध्या बीटा व्हर्जनमध्ये (Beta Version) दिसत आहेत. त्यापैकी अनेक फीचर्सचं टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर WhatsApp अपडेट्समध्ये हे फीचर अ‍ॅड केली जातील आणि नंतर आपण अ‍ॅप अपडेट केल्यानंतर ती फीचर आपल्याला वापरता येईल.

    First published:

    Tags: Whatsaap, Whatsapp, Whatsapp alert