मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नको त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमुळे हैराण झालात? सेटिंगमध्ये करा फक्त हे बदल !

नको त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमुळे हैराण झालात? सेटिंगमध्ये करा फक्त हे बदल !

कोणीही आपल्याला WhatsApp ग्रूपमध्ये अ‍ॅड करतं आणि त्या मेसेजमुळे आपण हैराण होतो. पण आता असं होणार नाही.

कोणीही आपल्याला WhatsApp ग्रूपमध्ये अ‍ॅड करतं आणि त्या मेसेजमुळे आपण हैराण होतो. पण आता असं होणार नाही.

कोणीही आपल्याला WhatsApp ग्रूपमध्ये अ‍ॅड करतं आणि त्या मेसेजमुळे आपण हैराण होतो. पण आता असं होणार नाही.

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 10 डिसेंबर: व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे सध्या संपर्काचं अत्यंत वेगवान आणि लोकप्रिय माध्यम झालं आहे. कोणतीही गोष्ट कोणालाही पटकन सांगायची असेल, फोटो, व्हिडिओ, लिंक, लोकेशन किंवा अगदी पैसेही कोणाला पाठवायचे असतील, तरी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ते सहज शक्य होतं. पण इतके फायदे असलेल्या या व्हॉट्सअ‍ॅपमुळे काही त्रासही होतात. त्यातला एक महत्त्वाचा त्रास म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स (Groups).

आपले जुने मित्र-मैत्रिणी एकत्रित भेटणं किंवा दूरवरच्या नातेवाईकांशी दररोज संपर्कात राहता येणं, तसंच ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत कामाचं नियोजन करणं या गोष्टी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे सोप्या झाल्या आहेत. पण अचानक कोणी तरी आपल्याला भलत्याच ग्रुपमध्ये अ‍ॅड करतं तेव्हा आपल्याला ती कटकटच वाटते. कारण असे अनेक ग्रुप्स झाले की आपण नुसते सदस्य असलो, तरी ते मॅनेज करणं आपल्याला अवघड जातं.

अनेक जण केवळ कामासाठीच व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. त्यांना या गोष्टींचा अधिक त्रास होतो. म्हणूनच ही समस्या लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅपने प्रायव्हसी सेटिंगमध्ये (Privacy Settings) काही सुविधा दिल्या आहेत.

सेटिंगमध्ये काय बदल करायचे?

तुमच्या परवानगीशिवाय कोणी तुम्हाला कोणत्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करू नये, असं वाटत असेल, तर सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला काही गोष्टी बदलाव्या लागतील.

आधी व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करा.

त्यातून ‘सेटिंग्ज’मध्ये, तिथून ‘अकाउंट’मध्ये आणि त्यातून प्रायव्हसी या पर्यायात जा.

त्यात तुम्हाला तीन पर्याय दिसतील - Everyone, My Contact and My Contacts Except.

त्यातला कोणताही पर्याय तुम्हाला निवडता येऊ शकतो.

Everyone - हा पर्याय निवडला तर कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये घेऊ शकतं.

My Contact - हा पर्याय निवडला तर केवळ तुमच्या काँटॅक्ट्समध्ये असलेल्या व्यक्तीच तुम्हाला ग्रुपमध्ये घेऊ शकतात.

My Contacts Except  - हा पर्याय निवडला तर तुमची इच्छा असल्यासच तुम्हाला ग्रुपमध्ये घेतलं जाऊ शकतं. तुम्हाला इन्व्हिटेशन येईल आणि ते तुम्ही स्वीकारलंत तरच तुम्हाला ग्रुपमध्ये सहभागी होता येईल.

आणखी एक नवं फीचर

अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने असं एक नवं फीचर अ‍ॅड केलं आहे, की ज्याच्या साह्याने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपमधून शॉपिंगही करू शकता. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता Add to Cart हे बटण देण्यात आलं आहे. अन्य कोणत्याही शॉपिंग साइटवर या बटणाचा वापर जसा केला जातो, त्याप्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅपमध्येही ते वापरता येईल. खरेदीचं पेमेंटही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपद्वारेच करता येऊ शकेल. ही फीचर्स ग्राहकांची गरज लक्षात घेऊन सुरू केली आहेत.

First published:

Tags: Techonology