• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • एकाच वेळी चार डिव्हाईसवर वापरता येणार WhatsApp; वाचा फायदे आणि तोटे

एकाच वेळी चार डिव्हाईसवर वापरता येणार WhatsApp; वाचा फायदे आणि तोटे

एकाच वेळी चार गॅजेट्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या चारही डिव्हाईसवर प्रत्येकवेळी लॉगइन करण्याची गरज भासणार नाही.

  • Share this:
    नवी दिल्ली, 22 जून : WhatsApp जवळपास सर्वच स्मार्टफोन युजरच्या जीवनात महत्त्वाचा भाग झाला आहे. दररोजच्या कामापासून ते ऑफिसपर्यंतची अनेक काम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Messaging App) होतात. आता व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरबाबत मोठी चर्चा आहे. लवकरच एकाच वेळी चार अ‍ॅडिशनल डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार आहे. ज्यामुळे युजर्स एकत्र पाच डिव्हाईसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पाचही डिव्हाईसवर प्रत्येकवेळी लॉगइन करण्याची गरज भासणार नाही. Multi Device Support - मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp सध्या या नव्या फीचरवर काम करत आहे. युजर या नव्या फीचरद्वारे एकत्र चार डिव्हाईसवर काम करू शकतील. म्हणजेच एकाच वेळी पाच मोबाईल किंवा डेस्कटॉपवर काम केलं जाऊ शकतं. WhatsApp च्या Multi Device Support फीचरला कंपनी लवकरच लाँच करू शकते. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, या फीचरचं पहिलं बीटा वर्जन सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी लाँच केलं जाईल. त्यानंतर हे फीचर स्मार्टफोनसाठी दिलं जाईल. WhatsApp मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचर वेगवेगळ्या डिव्हाईसवर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी युजर ज्या मोबाईल नंबरवरुन अकाउंट बनवत आहेत, त्या नंबरवर OTP जाऊ शकतो. OTP वेरिफाय झाल्यानंतर अधिकाधिक चार अ‍ॅडिशनल डिव्हाईसमध्ये एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट युजर वापरु शकतील.

    (वाचा - फेसबुकवर मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक, प्रकार ऐकून व्हाल हैराण)

    सुरुवातीला येईल ही समस्या - WhatsApp चं हे फीचर वापरणारे युजर, अशा युजर्सला मेसेज करू शकणार नाहीत, जे आपल्या फोनमध्ये आउटडेटेड WhatsApp वर्जन वापरतात. या फीचरमुळे सुरुवातीला परफॉर्मेन्स आणि क्वॉलिटीबाबत काही समस्या येऊ शकतात. परंतु काही काळानंतर त्या सोडवल्या जातील. सध्या या फीचरचा वापर करण्यासाठी बीटा टेस्टरला इन्वाईट करण्यात आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप मागील अनेक महिन्यांपासून या प्रोजेक्टवर काम करत आहे. डिव्हाईस जोडण्यासाठी एक नवं सिस्टमदेखील तयार केलं जात आहे. युजर हे फीचर लाँच झाल्यानंतर मेन डिव्हाईसमधून दुसऱ्या सर्व डिव्हाईसला कंट्रोल करू शकतील. तसंच कोणतंही डिव्हाईस लिंक किंवा अनलिंक करू शकतील.
    Published by:Karishma Bhurke
    First published: