मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नवं फीचर! आता WhatsApp वर आधीपासूनच चालू असलेल्या Video Call मध्ये करता येणार जॉईन

नवं फीचर! आता WhatsApp वर आधीपासूनच चालू असलेल्या Video Call मध्ये करता येणार जॉईन

इथे WhatsApp Web तुम्ही लॉगइन केलं नाही असं वाटत असेल, तर इतर कोणी ते वापरत असल्याची शक्यता असू शकते. तेथून अकाउंट लॉगआउट करा.

इथे WhatsApp Web तुम्ही लॉगइन केलं नाही असं वाटत असेल, तर इतर कोणी ते वापरत असल्याची शक्यता असू शकते. तेथून अकाउंट लॉगआउट करा.

सातत्याने अपडेटेड फीचर देणारं व्हॉटसॲप आता युजरसाठी नवं फीचर उपलब्ध करुन देण्याच्या तयारीत आहे. व्हॉटसॲपने जॉईनेबल कॉल (Joinable Call) हे फीचर रोलआऊट करण्याची तयारी सुरू केली आहे.

नवी दिल्ली, 20 जुलै : व्हॉटसॲप (WhatsApp) सर्वाधिक लोकप्रिय मेसेंजर ॲप (Messenger App) आहे. मेसेज सोबतच ग्रुप व्हॉईस कॉल्स किंवा ग्रुप व्हिडीओ कॉल्ससारखे फीचर व्हॉटसॲप युजर्समध्ये विशेष लोकप्रिय आहेत. सातत्याने अपडेटेड फीचर देणारं व्हॉटसॲप आता युजरसाठी नवं फीचर उपलब्ध करुन देण्याच्या तयारीत आहे. व्हॉटसॲपने जॉईनेबल कॉल (Joinable Call) हे फीचर (Feature) रोलआऊट करण्याची तयारी सुरू केली आहे.

ग्रुपवर आधीपासूनच सुरू असलेला व्हॉईस (Voice call) किंवा व्हिडीओ कॉल (Video Call) जॉईन करणं या फीचरमुळं शक्य होणार आहे. अनेकदा व्हॉटसॲपमधील ग्रुप व्हॉईस किंवा व्हिडीओ कॉल आपल्याकडून मिस (Miss) होतो आणि अशा कॉलमध्ये जॉईन करुन घेण्यासाठी आपल्याला कॉल मेंबरला विनंती करावी लागते. परंतु आता जॉईनेबल कॉल या सुविधेमुळे असा मिस्ड कॉल युजर आपल्या वेळेनुसार जॉईन करू शकणार आहे. तसंच जोपर्यंत ग्रुपवर कॉल सुरू आहे तोपर्यंत युजर कॉल ड्रॉप किंवा पुन्हा जॉईन करू शकणार आहे.

याशिवाय व्हॉटसॲप नव्या कॉलबाबतची इन्फो स्क्रिनवर (Info Screen) दाखवणार आहे. यामुळे या कॉलसाठी कोणकोणत्या लोकांना इन्व्हाईट (Invite) केलं आहे, परंतु, त्यांनी कॉल जॉईन केलेला नाही याची माहिती युजरला मिळू शकणार आहे. तसंच युजर, कॉलमधील सहभागी झालेले मेंबर्सदेखील या कॉलबाबतची माहिती स्क्रिनवर पाहू शकणार आहेत. व्हॉटसॲपच्या या नवीन फीचरमुळे युजरला व्हॉटसॲपच्या कॉल लॉगवर टॅप टू जॉईन (Tap To Join) हा ऑप्शन दिसेल. जेणेकरुन सुरू असलेला कॉल युजरकडून मिस झाला तरी तो आधीच चालू असलेल्या कॉलमध्ये सहभागी होऊ शकणार आहे.

(वाचा - Online Railway Ticket बुक करताना येतेय समस्या? घरबसल्या काही सेकंदात करा बुकिंग)

ज्या युजर्सला व्हॉटसॲपच्या या फीचरचा वापर करायचा आहे, त्यांना सर्वात आधी व्हॉटसॲपच्या कॉल लॉगमध्ये जावं लागेल. त्यानंतर युजर त्यांना हव्या त्या कॉलमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. तिथूनच मिस्ड झालेल्या ग्रुप कॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी Join वर टॅप करावं लागेल. विशेष म्हणजे हा ऑप्शन ऑनगोईंग कॉल (Ongoing Call) म्हणजेच सुरू असलेल्या कॉलमध्ये सहभागी होण्यासाठीच वापरता येईल.

(वाचा - WhatsApp Chat आता आणखी सुरक्षित होणार; पाहा तुमच्यावर कसा परिणाम होणार)

ग्रुप कॉल कसा केला जातो?

ग्रुप चॅटवर व्हिडीओ कॉल सुरू करण्यासाठी युजरल सर्वात आधी ज्या व्यक्तींशी संवाद साधायचा आहे, त्याचं व्हॉटसॲप चॅट ओपन करावा लागेल. जर एखाद्या ग्रुपमध्ये 9 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती असतील, तर Group Call Button वर टॅप करावं लागेल. परंतु, जर ग्रुपमध्ये 8 किंवा त्यापेक्षा कमी व्यक्ती असतील तर युजरला Video Call वर टॅप करावं लागणार आहे.

First published:

Tags: Whatsapp alert, Whatsapp New Feature, Whatsapp News, WhatsApp user