नवी दिल्ली, 16 मार्च: स्मार्टफोन युजर्सकडून (Smartphone Users) इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये व्हॉट्सअॅप (Whatsapp) हे सर्वांत जास्त प्रमाणात वापरलं जाणारं अॅप आहे. बरेच लोक संदेश पाठविण्यासाठी आणि व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी याचा वापर करतात. व्हॉट्सअॅप हा आता आपल्या मोबाइलमधील अविभाज्य घटक झाला आहे. काही कारणानं आपल्याला आपला मोबाइल नंबर बदलण्याची वेळ आली तर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो तो आपल्या व्हॉट्सअॅप चॅटचं (whatsapp Chat) काय ? दुसऱ्या नंबरवर आधीच्या नंबरवरील व्हॉट्सअॅप चॅट कसं मिळणार? हा सगळा डेटा जाणार की काय याची भीती वाटत असते; पण आता काळजीचं काही कारण नाही. कारण व्हॉट्सअॅपनं आपला फोन नंबर बदलला तरी आपल्या जुन्या नंबरवरील सर्व व्हॉट्सअॅप चॅट नव्या नंबरवर उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली आहे.
एनडीटीव्ही डॉट कॉमनं ही माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या या चेंज नंबर फिचरमुळे तुमचा व्हॉट्सअॅपचा नंबर बदलला आहे, हा संदेशदेखील तुमच्या कॉन्टॅक्टमधील लोकांना आपोआप पाठवला जाईल.
यासाठी एक छोटीशी प्रक्रिया युजर्सना करावी लागेल. प्रथम तुमचा मोबाईल नंबर बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, आपल्या फोनमध्ये नवीन फोननंबरचे सिम कार्ड घाला. त्यावर एसएमएस किंवा फोन कॉल मिळत असल्याची खात्री करा. जुना फोननंबरदेखील व्हॉट्सअॅपवर अद्याप रजिस्टर आहे, याची खात्री करून घ्या. व्हॉट्सअॅप सेटिंग्ज मेनूमध्ये आपले प्रोफाइल टॅप करून फोन नंबर तपासू शकता. हे झाल्यानंतर खालील टप्प्यांनी पुढील प्रक्रिया करा.
- आपल्या फोनवर व्हॉट्सअॅप उघडा.
>- आयफोन (iPhone) युजर असल्यास सेटिंग्जवर (Settings) जा. अँड्रॉइड (Android) युजर्ससाठी, स्क्रीनच्या वरील-उजव्या कोपर्यातील मेनूवर टॅप करुन सेटिंग्ज मेनूमध्ये प्रवेश करता येतो.
- आता अकाउंट (Account) या पर्यायावर टॅप करा आणि नंतर चेंज नंबरवर (Change Number) क्लिक करा.
- आता एक स्क्रीन दिसेल ज्यावर नवीन नंबरवर एसएमएस (SMS) किंवा फोन कॉल (Phone Call) प्राप्त करण्यासाठी कन्फर्म करायचे का असे विचारले असेल. कन्फर्म असेल तर नेक्स्टवर (NEXT) क्लिक करा.
- आपला जुना आणि नवीन नंबर टाका.
- आपला व्हॉट्सअॅप नंबर बदलण्याच्या शेवटच्या टप्प्यावर जाण्यासाठी नेक्स्टवर (NEXT) क्लिक करा.
- व्हॉट्सअॅप आता विचारेल की तुमच्या सर्व कॉन्टॅक्टसना नवीन नंबरबद्दल सूचित करायचे का?. तुम्ही ऑल कॉन्टॅक्टस (Contacts), कॉन्टॅक्टसस आय हॅव चॅट विथ (Contacts I Have Chat With) किंवा तुम्हाला ज्यांना या बदलांविषयी माहिती द्यायची आहे ते नंबर (Custom Number) यापैकी हवा तो पर्याय निवडू शकता. त्यानुसार अॅपद्वारे आपोआप व्हॉट्सअॅप ग्रुप्सना तुमचा व्हॉट्सअॅप नंबर बदलल्याचा संदेश पाठवेल.
- आता डन (Done) या ऑप्शनवर क्लिक करा.
हे वाचा - भारतीय युट्यूबर्सच्या कमाईत होणार घट; काय आहे कारण?
आता व्हॉट्सअॅप तुम्हाला तुमचा नवीन फोन नंबर (New Number) रजिस्टर करण्याची सूचना देईल. यासाठी एसएमएस किंवा फोन कॉलद्वारे सहा-अंकी कोड मिळेल. तो टाकल्यावर नवीन नंबर रजिस्टर होईल, ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुमचे सर्व व्हॉट्सअॅप चॅट्स नवीन फोन नंबरवर उपलब्ध होतील आणि तुम्ही नवीन नंबरवरून व्हॉट्सअॅप चॅट्स पुढे चालू ठेवू शकता. तुम्ही फोन नंबरसह फोनदेखील बदलत असाल तर मात्र जुन्या फोनवरील व्हॉट्सअॅप चॅट्सचा बॅकअप(Backup) गुगल ड्राइव्हवर (Google Drive) किंवा आयक्लाउडवर (i Cloud) घेणं आवश्यक आहे. नवीन फोनवर हा बॅकअप रिस्टोअर करणं आवश्यक आहे.
https://gadgets.ndtv.com/how-to/features/whatsapp-how-to-change-phone-number-without-losing-chats-steps-guide-2364035
प्राची
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news, Whatsapp, WhatsApp features