WhatsApp वर असं सुरू करा ‘Disappearing Message’ फीचर; 7 दिवसांत गायब होणार चॅट

WhatsApp वर असं सुरू करा ‘Disappearing Message’ फीचर; 7 दिवसांत गायब होणार चॅट

एखाद्या युजरने मेसेज आपोआप डिलिट होण्याआधी बॅकअप घेऊन ठेवला, तर ती फाईल कायमस्वरूपी सेव्ह होईल. हे फिचर ऑटो-डाउनलोड झाल्यास मीडिया फाईल्स फोनवर सेव्ह होतील, पण चॅटमधून सात दिवसांनंतर ती फाईल दिसेनाशी होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : व्हॉट्सअ‍ॅपचे (WhatsApp) 'डिसअपिअरिंग मेसेज’ (disappearing messages) फिचर आता भारतातही उपलब्ध झालं आहे. युजर्स आयओएस (iOS), अँड्रॉइड (Android), केएआयओएस (KaiOS), वेब (web) आणि डेस्कटॉपवरही (desktop) त्याचा वापर करू शकतात. या फिचरमुळे व्हॉट्सअ‍ॅपवरील मीडिया फाईल्ससह सर्व मेसेज सात दिवसांनंतर आपोआप दिसेनासे होतात. हे फिचर युजर्सना स्वतः एनेबल करावे लागेल. ग्रुप चॅटससाठी देखील हे फिचर वापरता येईल. पण त्यासाठी हे फिचर सुरू करायचे किंवा नाही हा निर्णय ग्रुपच्या अ‍ॅडमिनवर अवलंबून असेल.

फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने, हे फिचर विश्वासार्ह युजर्ससोबत वापरावं, असा इशाराही दिला आहे. कारण स्क्रीनशॉट घेण्याची सुविधा सर्वांना उपलब्ध आहे.

(वाचा - तुम्हीही हा पासवर्ड ठेवलाय?हॅकिंगची शक्यता; या वर्षातील बिनकामाचे 20 पासवर्ड)

अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हायसेसवर व्हॉट्सअ‍ॅपचे हे फिचर वापरायचं असेल, तर आधी व्हॉट्सअ‍ॅप चॅट ओपन करा. त्यानंतर कॉन्टॅक्ट नेमवर क्लिक करा नंतर ‘डिसअपिअरिंग मेसेज’ वर क्लिक करा 'कंटिन्यू' असा ऑप्शन आला की ते सिलेक्ट करा. डेस्कटॉप, केएआयओएस आणि वेबसाठीही याच पध्दतीने हे फिचर सुरू करता येईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. याच पध्दतीने हे फिचर नको असल्यास ते बंद ही करता येईल.

(वाचा - whatsapp वर डिलीट झालेले फोटो असे करा डाउनलोड; जाणून घ्या सोपी ट्रिक

ग्रुप चॅट्ससाठी अ‍ॅडमिनला प्रथम अँड्रॉइड किंवा आयओएसवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चॅट ओपन करावं लागेल. त्यानंतर ग्रुप नेमवर जाऊन ‘डिसअपिअरिंग मेसेज’ आणि त्यापुढे ‘कंटिन्यू’ ऑप्शन सिलेक्ट केला की, हे फिचर सुरू होईल. एकदा हे फिचर सुरू झालं की, चॅट बॉक्समध्ये दोन्ही पार्टीजना ‘डिसअपिअरिंग मेसेज’ कार्यान्वित झाल्याचा मेसेज दर्शवेल. अर्थात यासाठी नोटिफिकेशन येणार नाही. डिसअपिअरिंग मेसेज एखाद्या ग्रुपला किंवा व्यक्तीला फॉरवर्ड केल्यास तो मेसेज काढून टाकता येणार नाही, असंही व्हॉट्सअ‍ॅपने म्हटलं आहे.

(वाचा - Netflix फ्रीमध्ये पाहण्याची संधी; जाणून घ्या कधी आणि कसा पाहता येणार कटेन्ट)

एखाद्या युजरने मेसेज आपोआप डिलिट होण्याआधी बॅकअप घेऊन ठेवला, तर ती फाईल कायमस्वरूपी सेव्ह होईल. हे फिचर ऑटो-डाउनलोड झाल्यास मीडिया फाईल्स फोनवर सेव्ह होतील, पण चॅटमधून सात दिवसांनंतर ती फाईल दिसेनाशी होईल. डिसअपिअरिंग मेसेजला तुम्ही रिप्लाय केलेला असेल तर सात दिवसांनंतर तो मेसेज दिसत राहील. हे फिचर कार्यान्वित करण्याआधीचे मेसेजेस, मीडिया फाईल्सवर याचा काहीही परिणाम होणार नाही. हे नवीन फिचर दिसत नसेल, तर व्हॉट्सअ‍ॅपचं लेटेस्ट व्हर्जन वापरावं लागेल.

Published by: Karishma Bhurke
First published: November 23, 2020, 5:18 PM IST

ताज्या बातम्या