WhatsApp वर येतंय जबरदस्त फीचर; 7 दिवसांत पाठवलेला मेसेज आपोआप गायब होणार

जर चॅट 7 दिवसांत गायब होण्यापूर्वी त्याचा बॅकअप घेतल्यास, तर तो गायब मेसेज गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह होऊन, पुन्हा मिळू शकतो. परंतु बॅकअप घेतला नसल्यास, डिलीट झालेला मेसेज पुन्हा रिस्टोर होणार नाही, तो पुन्हा मिळणार नाही.

जर चॅट 7 दिवसांत गायब होण्यापूर्वी त्याचा बॅकअप घेतल्यास, तर तो गायब मेसेज गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह होऊन, पुन्हा मिळू शकतो. परंतु बॅकअप घेतला नसल्यास, डिलीट झालेला मेसेज पुन्हा रिस्टोर होणार नाही, तो पुन्हा मिळणार नाही.

  • Share this:
    नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : WhatsApp लवकरच नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर कंपनी येणाऱ्या अपडेटसह उपलब्ध करणार आहे. हे फीचर येण्याआधीच WABetaInfo ने याबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यानुसार, हे फीचर कसं काम करेल याबाबत काही माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ‘Disappearing Message’ हे नवं फीचर आणणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, युजर्स या ‘Disappearing Message’ चा वापर कधीही करू शकतात. पण या फीचरसोबत कस्टमाइज करण्याचा ऑप्शन मिळणार नाही. म्हणजे, हे फीचर Enable केल्यावर येणारे सर्व नवे मेसेज 7 दिवसांनंतर गायब होणार आहेत. सात दिवसांपर्यंत मेसेज ओपनच केला नाही, तरीही हे फीचर Enable असल्यास मेसेज डिलीट होईल. जर disappearing message अशा युजरला फॉरवर्ड केल्यास, ज्याच disappearing message फीचर ऑफ आहे, तर त्याच्याकडे मेसेज गायब होणार नाही. (वाचा - दिवाळीआधी Google Pay मध्ये मोठा बदल; काय आहे जाणून घ्या) मिळालेल्या माहितीनुसार, जर चॅट 7 दिवसांत गायब होण्यापूर्वी त्याचा बॅकअप घेतल्यास, तर तो गायब मेसेज गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह होऊन, पुन्हा मिळू शकतो. परंतु बॅकअप घेतला नसल्यास, डिलीट झालेला मेसेज पुन्हा रिस्टोर होणार नाही, तो पुन्हा मिळणार नाही. युजर्स या गायब होणाऱ्या मेसेज Forward करू शकतात, किंवा त्याचा Screenshot ही घेता येणार आहे. त्याशिवाय Disappearing Images आणि Video कॅमेरा रोलमध्ये सेव्ह करता येणार आहे. त्यासाठी सेव्ह टू कॅमेरा रोल हा ऑप्शन मिळणार आहे, जो मॅन्युअली Enable करावा लागेल. रिपोर्टनुसार, Disappearing Messages फीचर iOS, Android, KaiOS आणि Web/Deskto युजर्ससाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published: