मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp चं नवं फीचर, पाहा काय होणार बदल

WhatsApp चं नवं फीचर, पाहा काय होणार बदल

यात कोणताही Error आल्यास रेकॉर्डर सेटिंग ओपन करा आणि व्हॉईस कॉल रुपात Force VoIP कॉल सिलेक्ट करा.

यात कोणताही Error आल्यास रेकॉर्डर सेटिंग ओपन करा आणि व्हॉईस कॉल रुपात Force VoIP कॉल सिलेक्ट करा.

WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी नवं फीचर अँड्रॉईड व्हॉट्सअ‍ॅप बीटा वर्जन नंबर 2.21.12.7 सह रोलआउट करणार आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 8 जून : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. कंपनी युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स लाँच करत असते. आता युजर्सचा चॅटिंग एक्सपीरियंस आणखीच चांगला होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक असं नवं फीचर आणणार आहे, ज्याद्वारे युजर चॅटिंग दरम्यान व्हॉईस मेसेज सेंड करण्यापूर्वी ते ऐकू शकतील. WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी नवं फीचर अँड्रॉईड व्हॉट्सअ‍ॅप बीटा वर्जन नंबर 2.21.12.7 सह रोलआउट करणार आहे.

रिपोर्टनुसार, कंपनी हे फीचर iOS साठी आधीपासूनच डेव्हलप करत आहे. आता हे फीचर अँड्रॉईड व्हर्जनसाठीही तयार केलं जात आहे. नव्या अपडेटसह मिळणाऱ्या या फीचरमुळे युजर रेकॉर्ड केलेला मेसेज सेंड करण्यापूर्वी ऐकू शकतील.

(वाचा - WhatsAppमध्ये End-to-end encryption नेमकं आहे तरी काय?जाणून घ्या हे कसं काम करतं)

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या फीचरद्वारे युजर्स स्टॉप बटणावर टॅप करुन व्हॉईस मेसेज ऐकू शकतील. आतापर्यंत युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कॅन्सलचा ऑप्शन मिळत होता, ज्यामुळे रेकॉर्ड केलेला मेसेज न ऐकताच डिलीट होतो. परंतु आता नव्या फीचरमध्ये हे बटण कॅन्सलऐवजी स्टॉप बटण होईल.

(वाचा - तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? सोप्या ट्रिकद्वारे असं तपासा)

PlayBack फीचर -

यापूर्वी कंपनीने फास्ट प्लेबॅक नावाचं फीचर लाँच केलं होतं. या फीचरमुळे युजर व्हॉईस मेसेजचा स्पीड 1x,1.5x किंवा 2x वर सेट करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या Fast Playback फीचरचा वापर करण्यासाठी WhatsApp अकाउंट अपडेट करावं लागेल.

First published:

Tags: Tech news, WhatsApp chats, Whatsapp New Feature, Whatsapp News