मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp चं जबरदस्त फीचर; Internet नसलं तरी करता येणार चॅटिंग

WhatsApp चं जबरदस्त फीचर; Internet नसलं तरी करता येणार चॅटिंग

व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवरुन Call Recorder- Cube ACR अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल.

व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवरुन Call Recorder- Cube ACR अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल.

WhatsApp च्या या फीचरच्या मदतीने युजर फोनशिवाय इतर चार वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये एकाच वेळी WhatsApp वापरु शकतील.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली,15 जुलै: WhatsApp च्या मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरबाबत (Multi-device support Feature) मोठी चर्चा आहे. आता कंपनीने हे फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या फीचरच्या मदतीने युजर फोनशिवाय इतर चार वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये एकाच वेळी WhatsApp वापरु शकतील. मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरची खास बाब म्हणजे फोन अ‍ॅक्टिव्ह नसताना किंवा इंटरनेट कनेक्टेड नसतानाही युजर इतर डिव्हाईस लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर WhatsApp Chatting करू शकतात. पण दुसऱ्या डिव्हाईसवर WhatsApp Access करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक आहे. कंपनी हे फीचर आता बीटा वर्जनमध्ये रोलआउट करत आहे. सुरुवातीला या युजर्सला मिळणार फायदा - कंपनी सुरुवातीला हे फीचर अशा युजर्ससाठी उपलब्ध करत आहे, जे व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा प्रोग्रामचा भाग आहेत. कंपनी येणाऱ्या काळात स्टेबल वर्जन युजर्सला बीटा वर्जनमध्ये स्वीच करण्याचा ऑप्शन देईल. त्याशिवाय हा ऑप्शन व्हॉट्सअ‍ॅपच्या Linked Devices स्क्रीनमध्येही ऑफर केला जाऊ शकतो. तुमच्यासोबत पैशांबाबत Fraud झाला? इथे मिळतील संपूर्ण पैसे, वाचा काय आहे प्रोसेस WhatsApp चे प्रमुख विल कॅथकार्टने बीटा वर्जनसाठी रोलआउट केल्या जाणाऱ्या मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरची माहिती आपल्या अधिकृत Twitter हँडलवरुन ट्विट केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, आता युजर्स फोनमध्ये अ‍ॅक्टिव्ह नसल्यासही WhatsApp चं डेस्कटॉप किंवा वेब वर्जन सुरू राहील. नवं फीचर कंपनीने रोलआउट करण्यास सुरू केलं आहे. कंपनी सतत आपल्या युजर्ससाठी काहीतरी नवं आणण्याच्या प्रयत्न करत असते. सध्या कंपनी अशाच नव्या फीचर्सवर काम करत आहे. या फीचर्समध्ये फोटो क्वालिटी, लिंक प्रीव्ह्यू, मल्टी-डिव्हाइस सपोर्ट आणि व्ह्यू वन्स (View Once) या फीचर्सचा समावेश आहे. नव्या फीचर्सवर काम चालू असून टेस्टिंगनंतर ती अँड्रॉईड आणि iOS मध्ये समाविष्ट केली जातील.
First published:

Tags: Tech news, WhatsApp features, Whatsapp News, WhatsApp user

पुढील बातम्या