लवकरच बदलणार WhatsAppचं रुप! जाणून घ्या काय आहेत नवे अपडेट

लवकरच बदलणार WhatsAppचं रुप! जाणून घ्या काय आहेत नवे अपडेट

व्हॉट्सॲपचं बदलणार रुपडं! या नव्या अपडेटमुळे फोन होणार नाही हॅंग.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : व्हॉट्सॲप सध्या नवनवे अपडेट घेऊन येत आहे. यातच आता युझरच्या फायद्यासाठी आणखी एक नवा अपडेट आणला आहे. हा नवा अपडेट जून्या बीटा युझरसाठी उपलब्ध आहे. मात्र लवकरच हा अपडेट इतरांसाठीही आणला जाणार आहे. यामध्ये एका मोठ्या बगला फिक्स करण्यात आले आहे. त्यामुळं आता युझरना व्हॉट्सॲप वापरण्यासाठी सोयीचे जाणार आहे. त्यामुळे जर तुमचा फोन व्हॉट्सॲपमुळे बंद होत असेल तर लगेचच अपडेट करा.

WABetaInfoने व्हॉट्सॲपच्या कॅमेरात बदल केले आहे. त्यांनी कॅमेरासाठी नवीन आयकॉन आणले आहे, ज्यामुळं फोटो काढताना फोन बंद होणार आहे. त्याचबरोबर व्यूफाइंडरचाही यात समावेश करण्यात आला आहे. व्हॉट्सॲपचा नवा कॅमेरा आयकॉन स्टेट्स टॅबमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर चॅटबारमध्ये असलेल्या कॅमेरा आयकॉनमध्येही बदल करण्यात आला आहे. या आयकॉनमध्ये आता एक हिरव्या रंगाची छटा असणार आहे.

वाचा-सावधान! WhatsApp अपडेट करू नका, फोनमध्ये निर्माण होतेय समस्या

त्याचबरोबर आता रात्री व्हॉट्सॲप वापरण्यासाठी डार्क मोडचाही समावेश केला आहे. दरम्यान व्हॉट्सॲपच्या बीटा अपडेट 2.19.328मध्ये डार्क मोडचा समावेश करण्यात आलेला नाही.

वाचा-AntiVirus पासून तुमच्या स्मार्टफोनला धोका, या 10 Apps पैकी तुम्ही कोणतं वापरताय?

काही दिवसांआधी WABetaInfoने अशी माहिती दिली होती की, ॲड्रॉइड आणि iOSसाठी लवकरच डार्क मोड फिचर आणले जाणार आहे. दरम्यान अद्याप या सगळ्या अपडेटसाठी रिलीज डेट देण्यात आली नाही. तरी, येत्या काही दिवसांत हे बदल दिसू लागतील. याआधी व्हॉट्सॲपनं ग्रुप इनवाइट सारखे फिटक आणले होते.

वाचा-सावधान! गुगलची 'ही' सर्विस वापरताय, बॅटरीसह स्क्रीन होऊ शकते खराब

त्यामुळं आता या नव्या फिचरमुळे युझरसाठी व्हॉट्सॲप वापरणे जास्त सोयीचे असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2019 12:00 PM IST

ताज्या बातम्या