WhatsApp च्या Disappearing Messages फीचरमध्ये येणार नवं अपडेट; असा होणार फायदा

WhatsApp च्या Disappearing Messages फीचरमध्ये येणार नवं अपडेट; असा होणार फायदा

सध्या या फीचरच्या अपडेटचं आणि चाचण्यांचं काम सुरू असून, नजीकच्या काळात आयओएस, अँड्रॉइड आणि वेब किंवा डेस्कटॉपवरही हे अद्ययावत फीचर उपलब्ध होईल, असंही WAbetaInfo ने आपल्याअहवालात नमूद केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 एप्रिल : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) लवकरच डिसअपिअरिंग मेसेज (Disappearing Message )या आपल्या फीचरचं नवं अपडेट लाँच करण्याची शक्यता आहे. आता सात दिवसांच्या ऐवजी 24 तासांची मर्यादा या फीचरमध्ये उपलब्ध होईल. याबाबत अद्याप चाचण्या सुरू असल्याची माहिती WAbetaInfo वेबसाइटने दिली आहे.

बिझनेस इन सायडरने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवीन सुधारित डिसअपिअरिंग मेसेज फीचर उपलब्ध होईल, असं या वेबसाइटनं म्हटलं आहे.

‘व्हॉट्सअ‍ॅपवर आधी उपलब्ध असलेलं 7 दिवसांची मर्यादा असलेले डिसअपिअरिंग मेसेज फीचर बंद होणार नाही, तर हेच फिचर 24 तासांच्या मर्यादेसह देखील (24 hours Limit) उपलब्ध होईल. एकाच फीचरचे दोन पर्याय उपलब्ध असतील. युजर आपल्याला हवा तो पर्याय निवडू शकणार आहे. वैयक्तिक किंवा ग्रुपमधील व्हॉट्सअ‍ॅपचॅटसाठी जेव्हा लोक डिसअपिअरिंग मेसेज फीचर वापरतात, तेव्हा सध्या सात दिवसांचा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे हे फिचर सुरू केलं, तर दर सात दिवसांनी ग्रुप किंवा वैयक्तिक चॅटमधील सर्व मेसेज आपोआप डिलीट होतात. आता हीच कालमर्यादा 24 तास अशी ही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे युजरला 24 तासानंतर चॅट नको असेल तर हे फीचर वापरून तो ते डिलीट करू शकतो.

सध्या या फीचरच्या अपडेटचं आणि चाचण्यांचं काम सुरू असून, नजीकच्या काळात आयओएस, अँड्रॉइड आणि वेब किंवा डेस्कटॉपवरही हे अद्ययावत फीचर उपलब्ध होईल, असंही WAbetaInfo ने आपल्याअहवालात नमूद केलं आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी बहुप्रतिक्षित डिसअपिअरिंग मेसेज हे फीचर दाखल केलं होतं. दोन व्यक्ती परस्परांशी करत असलेल्या वैयक्तिक चॅटमध्ये (Personal Chat), एक व्यक्ती हे फीचर सुरू किंवा बंद करू शकते, तर ग्रुपमध्ये अ‍ॅडमिनला हे काम करावं लागतं.

युजरला WhatsApp Chat कायमचे नसतात याचा दिलासा मिळेल, तसंच व्यावहारिक पातळीवर आपण काय बोलत आहोत, याचं भानही राखलं जाईल, या उद्देशानं व्हॉट्सअ‍ॅपवर सात दिवसांच्या मर्यादेसह डिसअपिअरिंग मेसेज हे फीचर आणण्यात आलं होतं. यामुळे चॅटचा ओघ नियंत्रणात ठेवणं शक्य झालं आहे. लोकांनी विश्वासू व्यक्तींसह केल्या जाणाऱ्या चॅटसाठीच हे फीचर वापरावं असं आवाहन व्हॉट्सअ‍ॅपनं केलं असून, एखादा संदेश महत्त्वाचा असेल किंवा तो सेव्ह करणं आवश्यक वाटत असेल तर तो संदेश गायब होण्याआधी त्याचा स्क्रीनशॉट काढणे किंवा तो एखाद्याला फॉरवर्ड करणे आवश्यक आहे.

First published: April 26, 2021, 6:00 PM IST

ताज्या बातम्या