नवी दिल्ली, 30 जून : व्हॉट्सअॅप (WhatsApp) लवकरच एक नवं फीचर आणणार आहे. यामुळे अँड्रॉईड (Android) युजर्ससाठी चॅट बॅकअप सिस्टममध्ये (Backup) काही बदल होणार आहेत. या बदलामुळे व्हॉट्सअॅप, स्टेटस अपडेटचा (WhatsApp Status) बॅकअप घेणं बंद करेल. WaBetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं, की हे नवे बदल सध्या Android च्या बीटा वर्जनसाठी WhatsApp चा एक भाग आहेत.
WhatsApp चॅट बॅकअप -
रिपोर्टनुसार, ज्यावेळी युजर WhatsApp App डेटाचा बॅकअप घेईल, त्यावेळी स्टोरेज सेव्ह करण्यासाठी स्टेटस अपडेट बॅकअपमध्ये सामिल केलं जाणार नाही. अनेक युजर्स व्हॉट्सअॅप स्टेटसला व्हिडीओ अपलोड करतात. यामुळे बॅकअपची साईज वाढते. युजर्स व्हिडीओला स्टेटसच्या रुपात अपलोड करतात, यामुळे बॅकअपही वाढू शकतो. व्हॉट्सअॅपची ही क्षमता लोकांना स्टोरेजच्या समस्येवर आळा घालण्यास मदत करू शकते.
बॅकअप गुगल ड्राईव्हवर (Google Drive) घेतला जातो, यातही बदल होऊ शकतो. व्हॉट्सअॅप, युजर्सच्या स्मार्टफोनवर डेटा बॅकअप घेणं सुरू करू शकतं. त्यामुळे कंपनी एका दिवसांत गायब होणाऱ्या व्हॉट्सअॅप स्टेटसला सेव्ह न करण्याचा निर्णय घेऊ शकते.
परंतु व्हॉट्सअॅपच्या iOS वर्जनसह असं नाही. यात व्हॉट्सअॅप स्टेटसला सामिल केलं जात नाही. हे नवं फीचर सध्या WhatsApp च्या अँड्रॉईड बीटा वर्जन 2.21.13.6 चा भाग आहे. सर्व युजर्ससाठी हे कधीपर्यंत जारी केलं जाईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp, Whatsapp alert