सावधान! WhatsApp अपडेट करू नका, फोनमध्ये निर्माण होतेय समस्या

सर्वच अॅप्स वेळोवेळी अपडेट करावी लागतात. मात्र, WhatsApp च्या लेटेस्ट अपडेटनंतर युजर्सच्या तक्रारी वाढल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 11, 2019 07:09 AM IST

सावधान! WhatsApp अपडेट करू नका, फोनमध्ये निर्माण होतेय समस्या

मुंबई, 10 नोव्हेंबर : व्हॉटसअॅपने प्ले स्टोअरवर अॅप अपडेट केलं आहे. ते इन्स्टॉल केल्यानंतर युजर्सना वापरताना काही अडचणी आल्याचं समोर आलं आहे. याबाबत WABetaInfo ला रिपोर्ट करताना युजर्सनी म्हटलं आहे की, लेटेस्ट व्हर्जन अपडेट केल्यानंतर फोनची बॅटरी वेगानं संपत आहे. ही समस्या iOS 2.19.112 अपडेट केल्यानंतर समोर आली आहे.

iOS युजर्सनी अनेक स्क्रीनशॉट शेअऱ केले आहेत. यामध्ये व्हॉटसअॅपमुळे कशाप्रकारे बॅटरी संपत आहे ते दाखवलं आहे.  सध्या काही अँड्रॉइड युजर्सनीदेखील अशी समस्या येत असल्याचं सांगितलं आहे.

एका युजरने सांगितलं की त्याची बॅटरी फक्त 15 मिनिटांत 23 टक्के संपली. फक्त एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा असं होत आहे.

युजर्सचे म्हणणे आहे की, थोड्या थोड्या वेळाने WhatsApp is draining your battery असं नोटिफिकेशन येंत. यामुळे फोन फुल चार्ज असतानाही बॅटरी कमी होत जाते.

AntiVirus पासून तुमच्या स्मार्टफोनला धोका, या 10 Apps पैकी तुम्ही कोणतं वापरताय?

Loading...

व्हॉटसअॅप युजर्ससाठी नुकतंच एक फीचर कंपनीने दिलं आहे. नेटफ्लिक्सचे ट्रेलर आता व्हॉटसअॅपवर दिले जात आहेत. नेटफ्लिक्सवर येणाऱ्या शोचे ट्रेलर पाहण्यासाठी त्या अॅपवर जाण्याची गरज नाही. कोणत्याही युजरने नेटफ्लिक्सची लिंक शेअर केली तर व्हॉटसअॅपच्या पिक्चर इन पिक्चर मोडमध्येच व्हिडिओ प्ले होईल.

सावधान! गुगलची 'ही' सर्विस वापरताय, बॅटरीसह स्क्रीन होऊ शकते खराब

Alert! बँक खातं रिकामं करणारं APP तुमच्या मोबाइलमध्ये? लगेच करा DELETE

VIDEO :..जर फडणवीसांनी बहुमत सिद्ध केलं नाही? जयंत पाटलांनी वर्तवला पुढचा अंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: whatsapp
First Published: Nov 11, 2019 07:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...