VIDEO : व्हॉट्सअॅपमध्ये होणार मोठा बदल, असा पाहता येणार व्हिडिओ

व्हाट्सअॅपवर व्हिडिओ पाहण्यासाठी आता एक नवी पद्धत येणार आहे. ज्यामुळे प्रवासादरम्यान तुमचा फोन लॉक असतानासुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकणार आहात.

News18 Lokmat | Updated On: Nov 26, 2018 05:50 PM IST

VIDEO : व्हॉट्सअॅपमध्ये होणार मोठा बदल, असा पाहता येणार व्हिडिओ

मुंबई, 26 नोव्हेंबर : व्हॉट्सअॅपवरील संवाद अधिक सोपं होण्यासाठी व्हॉट्सअॅप सतत काहीतरी नवीन अपडेट करत असतं. टेक्नोलॉजी संवादाचा बादशाह व्हॉट्सअॅपमध्ये आता नवा बदल येणार आहे. व्हॉटसअॅपने दिलेल्या माहितीनुसार सर्व युजर्ससाठी एका फिचरवर अॅप काम करत आहे. ज्यामुळे व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ बघण्याची तुमची पद्धत बदलली जाईल.

व्हॉट्सअॅपचं येणारं नवीन फिचर iOSसाठी असेल. या फिचरमध्ये Push Notificationवर येणाऱ्या व्हिडिओमध्ये बदल होणार आहेत. तुम्हाला नोटीफिकेशनवर येणारा व्हिडिओ पाहण्यासाठी आधी व्हॉट्सअॅप उघडावं लागायचं परंतु आता मोबाईल स्क्रिनवर थेट व्हिडिओ पाहता येणार आहे.

व्हॉट्सअॅपमध्ये होणाऱ्या बदलामुळे व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअॅप न उघडता पाहता येणार आहे. नोटीफिकेशनवर आलेला व्हिडिओ मोबाईल स्क्रिनवर पाहता येणार आहे.
व्हॉट्सअॅपच्या प्रत्येक अपडेटवर नजर ठेवून असणारं WABetaInfoच्या ट्विटनुसार iOS युजर्ससाठी व्हॉट्सअॅप 2.18.102.5 हे अपडेट फिचर येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: whatsapp
First Published: Nov 26, 2018 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...