Home /News /technology /

व्हॉट्सअ‍ॅप वापरणं सुरक्षित आहे का? यामुळे तुमच्या मेसेजेसना धोका असू शकतो का? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप वापरणं सुरक्षित आहे का? यामुळे तुमच्या मेसेजेसना धोका असू शकतो का? जाणून घ्या

जरी अॅपल युजरचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी चांगल्या उपाययोजना करत असलं तरीही या ड्राइव्हवर तुमच्या महत्त्वाच्या मेसेजच्या कॉपी कोणत्याही सुरक्षिततेविना उपलब्ध आहेत ही चिंतेची बाब आहे.

  नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : टेलिग्राम आणि सिग्नल या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या आव्हानांना टक्कर देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) स्वतःला एक सुरक्षित मेसेजिंग प्लॅटफॉर्म बनवायचा प्रयत्न केला आहे. परंतु, अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपमध्ये गोपनीयता भंग होण्याची नोंद केली गेली आहे, अशाच प्रकारची एक घटना समोर आलीआहे. आयओएस (iOS) वापरणाऱ्यांचे बॅकअप डिफॉल्टनुसार, आयक्लाउड ड्राइव्हला (iCloud Drive) जोडलेले असतात. आयओएस वापरणाऱ्यांचे सर्व मेसेज व्हॉट्सअप (WhatsApp Messages) आय क्लाउडवर सेव्ह करते पण या प्रक्रियेच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न आता निर्माण झाले आहेत. एका अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅपद्वारे, युझर्सना एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (end-to-end encryption) ऑफर करत असताना, ते आयक्लाउड ड्राईव्हवर आपले मेसेज सेव्ह करतं. पण आयक्लाउड तेच स्टँडर्ड एनक्रिप्शन देत नाही, त्यामुळे आय क्लाउडमध्ये साठवलेल्या मेसेजच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होतो आणि युजरच्या चॅटना धोका पोहोचू शकतो. (वाचा - आता फोनवर बोलणं महागणार;नव वर्षात टेरिफ प्लान वाढवायच्या तयारीत आहेत या कंपन्या) ड्राइव्ह असुरक्षिततेचा अर्थ म्हणजे ड्राइव्हवर सेव्ह केलेल्या तुमच्या खासगी, महत्त्वाच्या मेसेजेसपर्यंत चोर दरवाज्याने पोहोचणं शक्य आहे. कारण तिथंल एंड टू एंड एनक्रिप्शन सुरक्षित नाही. व्हॉट्सअॅप सर्व संदेशांचं संरक्षण करण्यासाठी वापरत असलेल्या स्टँडर्ड एंड- टू-एंड-एन्क्रिप्शन सिक्युरिटीचा वापर सगळीकडे करत नसल्यामुळे तुमच्या सिक्युरिटी कीची एक कॉपी अॅपल ड्राइव्हमध्ये (Apple’s drive) राहते. त्यामुळे तुमच्या मेसेजची सुरक्षितता धोक्यात येते. जरी अॅपल युजरचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी चांगल्या उपाययोजना करत असलं तरीही या ड्राइव्हवर तुमच्या महत्त्वाच्या मेसेजच्या कॉपी कोणत्याही सुरक्षिततेविना उपलब्ध आहेत ही चिंतेची बाब आहे.

  (वाचा - आता Whtasapp वरूनही पाठवता येणार पैसे, कधी आणि कसं सुरू होणार जाणून घ्या)

  याचसोबत, व्हॉट्सअ‍ॅपवरच्या ‘डिसअपियरिंग मेसेजेस’(disappearing message) फीचरवरही खूप टीका होत आहे आणि ते अर्धवट अवस्थेत बाजारात उतरवलं गेल्याचं बोललं जातंय. सुरूवातीला, हे अदृश्य होणारे मेसेज किती सुरक्षित असतील असा प्रश्न उपस्थित झाला आणि या मेसेजला रिप्लाय दिला गेला असेल, तर ते सगळे मेसेज अदृश्य होतील का असाही प्रश्न विचारला जातोय. त्यानंतर हे संदेश आपल्या आयक्लाउड बॅकअपमध्ये (iCloud backup) सेव्ह होतील, आपण आपले मेसेजेस डिलिट करण्यापूर्वी आपल्या सर्व चॅट्सची एक कॉपी बनवू शकतो का, असाही प्रश्न आहे. व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमधून स्क्रीनशॉट पाठवण्यावर निर्बंध लादण्यातदेखील अयशस्वी ठरला आहे. हा निश्चितपणे एक गुंतागुंतीचा विषय आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत, योग्य सुरक्षा प्रोटोकॉल नसेल तर अदृश्य होणाऱ्या मेसेजेसचा मूळ हेतूच बाद ठरतो. (वाचा - घरबसल्या 10 मिनिटांत फ्रीमध्ये बनवा Pan Card; जाणून घ्या प्रक्रिया) या सर्व दोषांचा एकत्रित विचार केल्यास व्हॉट्सअपच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या सुरक्षित प्लॅटफॉर्मच्या (WhatsApp security) तुलनेत आमची सेवा अधिक सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या व्हॉट्सअपचा लौकिक कमी होऊ शकतो. अर्थात, व्हॉट्सअप यावर काय प्रतिक्रिया देतं आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Whatsapp, Whatsapp messages

  पुढील बातम्या