मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' वेबसाईटमुळे होऊ शकता कंगाल

व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' वेबसाईटमुळे होऊ शकता कंगाल

तुम्ही जर व्हॉट्सॲप (WhatsApp), फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

तुम्ही जर व्हॉट्सॲप (WhatsApp), फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

तुम्ही जर व्हॉट्सॲप (WhatsApp), फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

    मुंबई, 24 डिसेंबर : अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मित्र, नातेवाईक, कुटुंबातील व्यक्तींच्या संपर्कात राहण्यासाठी तसेच व्यावसायिक दृष्टीकोनातून सोशल मीडियाचा वापर होत आहे. एकीकडे सोशल मीडियाचा वापर वाढत असताना, या माध्यमातून सायबर गुन्ह्यांचं (Cyber Crime) प्रमाण देखील वाढत आहे. तुम्ही जर व्हॉट्सॲप (WhatsApp), फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या पेरेंट कंपनी मेटानं (Meta) नुकताच एक इशारा देत युजर्सला सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. अनेक फिशिंग वेबसाईट्सचे (Fishing Websites) पेजेस हे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या पेजेस सारखीच दिसत असून, युजर्सला धोका देण्याचं, फसवणूक करण्याचं ते एक माध्यम ठरत असल्याचं मेटानं म्हटलं आहे. याविषयीची माहिती 'झी न्यूज हिंदी'ने दिली आहे.

    "युजर्सनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सारख्या दिसणाऱ्या फिशिंग वेबसाईट्सच्या पेजेस पासून सावध राहणं गरजेचं आहे. अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही", असं मेटा कंपनीनं म्हटलं आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी काय करावं? असा प्रश्न जर तुम्ही विचारत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की अशा काही गोष्टी आहेत की ज्याबाबत काळजी घेऊन तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. यात सर्वप्रथम कोणत्याही अनोळखी लिंकवर (Link) क्लिक करण्यापूर्वी त्याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या. तसेच कोणत्याही प्रकारची अॅक्टिव्हिटी करण्यापूर्वी लिंकची यूआरएल (URL) तपासा. या गोष्टी केल्यास तुमचा ऑनलाईन स्कॅम्सपासून (Online Scams) बचाव होऊ शकतो.

    हेही वाचा : नगरमधील शाळेला कोरोनाचा विळखा, 19 विद्यार्थी पॉझिटिव्ह

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या ऑनलाईन स्कॅमबाबत माहिती देताना मेटानं सांगितलं की, "आम्ही 39 हजारांहून अधिक अशा वेबसाईट्स शोधून काढल्या आहेत की ज्या फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससारख्या दिसतात. यामाध्यमातून युजर्सकडून पासवर्डवैगरे गोष्टी सहज मिळवण्यात सायबर गुन्हेगार यशस्वी ठरत आहेत."

    हेही वाचा : इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तींकडून वारंवार व्हिडीओ कॉल येतोय? 'अशी' सूटका मिळवा

    सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सायबर गुन्हेगारीची पद्धत जरा वेगळी आहे. एका फिशिंग स्कॅमच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप सारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची नकली वेबसाईट तयार करतात. त्यानंतर विचित्र अशा लिंकवर क्लिक करण्यासाठी युजर्सला भाग पाडतात. वेबसाईटशी निगडीत माहिती असावी, असं समजून युजर्स या लिंकवर क्लिक करतात. मात्र यामुळे युजर्सचा लॉग-इन पासवर्ड (Log-In Password) आणि सर्व डेटा सायबर गुन्हेगारांच्या हाती लागतो. काही वेळा तर यात युजर्सचं आर्थिक नुकसानही होतं.

    युजर्सची सुरक्षितता लक्षात घेत आणि अशा प्रकारचे स्कॅम्स रोखण्यासाठी मेटानं सायबर गुन्हेगारांविरोधात कॅलिफोर्निया न्यायालयात खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या आधारे युजर्सला सुरक्षितता मिळेल आणि अशा प्लॅटफॉर्म्सचा दुरुपयोग करणाऱ्यांना एक संदेश मिळेल असं मेटानं स्पष्ट केलं आहे.

    First published: