मुंबई, 19 मार्च : रात्री अचानक मोबाईलवरचं व्हॉट्सअॅप बंद झालेलं लक्षात आलं असेल. सुरुवातीला इंटरनेट बंद झालं असं वाटत असेल. पण प्रत्यक्षात फक्त तुमच्याच फोनला नाही, तर जगभरात अनेकांना हा अनुभव आला. शुक्रवारी रात्री 11 नंतर जगभरात अनेक ठिकाणी whatsapp, facbook, instagram या सेवा ठप्प झाल्या. या तीनही सेवा सध्या फेसबुक ही एकच कंपनी देत आहे. नेमका काय तांत्रिक समस्या निर्माण झाली हे लक्षात आलेलं नाही.
जगभरात अनेकांनी हा इश्यू असल्याचं लक्षात येताच twitter च्या माध्यमातून मांडला. हा व्हायरसचा हल्ला आहे की काही तांत्रिक समस्या आहे, हे अद्याप लक्षात आलेलं नाही. फेसबुककडून अजूनही औपचारिकपणे काही प्रतिक्रिया आलेली नाही.
ट्विटरवर मात्र यूजर्सनी तातडीने मीम्सचाही पाऊस पाडला.
Everyone running to twitter to confirm that WhatsApp is down. #WhatsAppDown pic.twitter.com/rCsc2zTGdD
— ʀᴀᴛʜᴏᴅ ᴅʜᴀᴠᴀʟ (@iamdhavalsinh) March 19, 2021
Sending messages on WhatsApp right now like: pic.twitter.com/b9F03T2TtH
— Adriano Espaillat (@RepEspaillat) March 19, 2021
शुक्रवारी 10.55 च्या सुमारात सुरुवातीला whatsapp आणि नंतर फेसबुक तसंच इन्स्टाग्रामवर काहीही पोस्ट होऊ शकलं नाही. भारतासह युरोप आणि अमेरिकेत काही ठिकाणी हीच समस्या जाणवल्याचं यूजर्सनी कळवलं आहे.
When Instagram & WhatsApp crashes, the people of Twitter: 🕺🕺#WhatsAppDown #instagramdown pic.twitter.com/JjzERSWYnS
— Dhanu_மதுரைக்காரன் (@madurakaranda2) March 19, 2021
गेल्या महिन्यात 19 फेब्रुवारीलासुद्धा अशाच प्रकारे फेसबुक ठप्प झालं होतं. पण तो प्रश्न थोड्याच वेळात सुटला होता.
साधारण अर्ध्या तासाने whatsapp आणि फेसबुकच्या सेवा भारतात सुरू झाल्या. अजूनही काही भागात या फेसबुक उघडायला समस्या येत असल्याचं काही यूजर्सनी सांगितलं. अद्यापही फेसबुककडून याविषयी काही औपचारिक कारण किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.