Home /News /technology /

तुम्हालाही जाणवतेय का Whatsapp वापरताना समस्या, असू शकतं 'हे' कारण

तुम्हालाही जाणवतेय का Whatsapp वापरताना समस्या, असू शकतं 'हे' कारण

whatsapp डाऊन होण्याची ही पहिली वेळ नाही याआधी 2019 आणि 2016 मध्येही अशाप्रकारे युझर्सना सामना करावा लागला होता.

    नवी दिल्ली, 15 जुलै: सगळ्यात सोपं आणि सर्वात जास्त मेसेज आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरलं जाणारं whatsapp डाऊन झाल्यानं युझर्सना मोठा त्रास सहन करावा लागला. whatsapp डाऊन झाल्यामुळे हे अॅप सुरू होण्यासाठी देखील काही जणांना समस्या आली. तर काही काळ मेसेज सेंड आणि रीसिव्ह होऊ शकत नव्हते. जगभरातील 72 टक्के लोकांना whatsapp वापरताना समस्या जाणवू लागली. Android आणि iOS या दोन्ही वापरकर्त्या 1.5 बिलियनहून अधिक युझर्सना अॅपमध्ये लॉगइन करण्यात अडथळे जाणवत होते. कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. ट्विटरसह वेगवेगळ्या सोशल मीडियावर युझर्सनी मेसेजिंग अॅप्लिकेशनमध्ये असलेल्या समस्यांविषयी पोस्ट केल्या आहेत. एका युझरने 4 तासांपूर्वी ही समस्या दूर झाली असल्याचंही म्हटलं आहे. ट्वीटरवर अनेक लोकांनी whatsapp वापरण्यात येणाऱ्या समस्या शेअर केल्या आहेत. whatsapp कडून यासंदर्भात अद्याप कोणतीही सूचना युझर्सना देण्यात आली नाही तर सोशल मीडियावर फोन रिस्टार्ट करण्याबाबत अनेक युझर्सनी सल्ला दिला आहे. श्रीलंका, पेरू, लंडन, नवी दिल्ली, न्यूयॉर्क, नेदरलँड्स, जर्मनी, इजिप्त, कोलंबिया, कझाकस्तान, स्वीडन, रोमानिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो, आयर्लंड इत्यादी देशांतील युझर्सना whatspp वापरताना समस्या निर्माण झाली होती. अशा पद्धतीनं whatsapp डाऊन होण्याची ही पहिली वेळ नाही याआधी 2019 आणि 2016 मध्येही अशाप्रकारे युझर्सना सामना करावा लागला होता.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Whatsapp, Whatsapp alert

    पुढील बातम्या