नवी दिल्ली, 7 डिसेंबर : इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp मागील अनेक महिन्यांपासून सतत नवे अपडेट देत आहे. आता WhatsApp ने एक नवं फीचर जारी केलं आहे. यामुळे युजर्सची प्रायव्हसी अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
WhatsApp मध्ये आधीच गायब होणाऱ्या मेसेजचं Disappearing Messages हे फीचर देण्यात आलं आहे. हे फीचर आधी सर्व चॅटसाठी ऑन करावं लागत होतं. पण आता युजर्सकडे सर्व नव्या वन-ऑन-वन चॅटसाठी Disappearing Messages ऑटोमॅटिकली टर्न ऑन करण्याचा ऑप्शन असेल.
हे फीचर सेट केल्यानंतर WhatsApp Chats चे सर्व मेसेज ऑटोमॅटिकली डिलीट होतील. म्हणजेच WhatsApp Users कडे आता एक नवा ऑप्शन असेल, जो नव्या चॅटसाठी हे फीचर डिफॉल्ट टर्न ऑन करुन ठेवू शकतात.
सेट टाइमनंतर चॅट्समधून मेसेज आपोआप डिलीट होतील. WhatsApp ने डिसअपीयरिंग मेसेज फीचर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केलं होतं. यात 7 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.
आता कंपनी Disappearing Messages साठी दोन नवे ड्युरेशन अॅड करत आहे. यात युजर्सला 24 तास आणि 90 दिवसांचा ऑप्शन मिळेल. त्याशिवाय आधीपासून असलेला 7 दिवसांचा ऑप्शनही मिळेल. युजरने हे फीचर ऑन केल्यानंतर त्यांच्या चॅटमध्ये एक मेसेज डिस्प्ले होईल, जो लोकांना याबाबत ऑन केलेल्या फीचरबाबत सांगेल.
जर युजरला मेसेज कायमस्वरुपी हवे असतील, तर ते Disappearing Messages फीचर हटवू शकतात. हे नवं सेटिंग ग्रुप चॅटला अफेक्ट करणार नाही. प्रत्येकी एका चॅटसाठी युजर Disappearing Messages ऑन किंवा ऑफ करू शकतात. हे फीचर ऑन केल्यास दिलेल्या कालावधी गेल्यानंतर युजर जुने मेसेज मिळवू शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, WhatsApp features, WhatsApp user