WhatsAppमध्ये झाला सर्वात मोठा बदल! आता आपोआप डिलीट होणार तुमचे मेसेज

WhatsAppमध्ये झाला सर्वात मोठा बदल! आता आपोआप डिलीट होणार तुमचे मेसेज

जाणून घ्या WhatsAppच्या नव्या फिचरबाबत फक्त एका क्लिकवर.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : व्हॉट्सअ‍ॅपच्या वतीनं युझरसाठी एक अतिशय महत्त्वाचे फिचर सादर करण्यात आले आहे. WABetaInfoने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅप 'डिलीट मेसेज' नावाच्या फिचरवर काम करत आहे, सध्या फक्त बीटा युजर्स वापरु शकतात. काही दिवसांपूर्वी अशी माहिती देण्यात आली होती की, व्हॉट्सअॅप Disappearing Messeage’ हे फीचर आणण्याची तयारी करत आहे. त्याचबरोबर आता हे वैशिष्ट्य आता व्हॉट्सअॅप डिलीट मेसेजच्या नावाखाली आणले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या वैशिष्ट्याची चाचणी 2.19.348 बीटा आवृत्तीवर चालू आहे.

आता तुम्ही असा विचार करत असाल की व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मेसेज डिलीट करण्याचे फिचर आधीही होते. मग या फिचरमध्ये काय नवीन आहे. चला या डिलीट मेसेजचे वैशिष्ट्य काय ते जाणून घेऊया...

वाचा-मृत्यूनंतर तुमच्या Google Account चं काय होणार?

व्हॉट्सअ‍ॅपनं दिलेल्या माहितीनुसार, युझर आपल्या Group Settingsमध्ये जाऊन ‘Delete Messages’चा पर्याय निवडू शकतात. या पर्यायाचा वापर करून चालू आणि बंद वेळ सेट करण्याचा पर्याय देखील दिसेल.

वाचा-Jio ने बंद केली जुनी ऑफर, ग्राहकांना मिळणार नाही फायदा

मिळणार 5 पर्याय

यामध्ये युझरना वेळेचे पाच पर्याय देण्यात येतील. यात पहिला 1 तास, दुसरा 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना आणि 1 वर्ष. जर आपण 1 तासाचा कालावधी निवडल्यास, पाठविलेला संदेश 1 तासानंतर स्वयंचलितपणे हटविला जाईल. हा पर्याय निवडल्यानंतर, संदेश आपोआप हटविले जातील. या वैशिष्ट्याबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे संदेश हटविल्यानंतर हटविलेल्या संदेशाचा कोणताही मागोवा राहणार नाही. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा तुम्ही चुकीच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकता त्यावेळी ‘delete for everyone’ असा पर्याय दिसतो. यावर मसेज डिलीट केल्यानंतर ‘This message has been deleted’ असा मजकूर दिसतो. मात्र आता नवीन फिचरमुळे तुम्ही मेसेज डिलीट केल्यानंतर असा मेसेज दिसणार नाही.

वाचा-लॅपटॉप शटडाऊन न करता झोपणं पडलं महागात, थोडक्यात वाचला जीव

Published by: Priyanka Gawde
First published: November 28, 2019, 7:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading