मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp वर Hello... असा मेसेज आला तर सावधान; अशी होतेय फसवणूक

WhatsApp वर Hello... असा मेसेज आला तर सावधान; अशी होतेय फसवणूक

WhatsApp वर फसवणुकीसाठी हॅकर्सनी एक नवा मार्ग काढला आहे. WhatsApp आपला प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी अपडेट देत असतं, परंतु युजर्सनेही सतर्क राहण्याची गरज आहे.

WhatsApp वर फसवणुकीसाठी हॅकर्सनी एक नवा मार्ग काढला आहे. WhatsApp आपला प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी अपडेट देत असतं, परंतु युजर्सनेही सतर्क राहण्याची गरज आहे.

WhatsApp वर फसवणुकीसाठी हॅकर्सनी एक नवा मार्ग काढला आहे. WhatsApp आपला प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी अपडेट देत असतं, परंतु युजर्सनेही सतर्क राहण्याची गरज आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp या एकाच प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हिडीओ, चॅट, फाइल्स, ऑडिओ-व्हिडीओ कॉल करता येत असल्याने हे अतिशय पॉप्युलर App ठरलं आहे. परंतु WhatsApp चा वापर करताना सतर्क राहण्याची गरज आहे. WhatsApp वर फसवणुकीसाठी हॅकर्सनी एक नवा मार्ग काढला आहे. WhatsApp आपला प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी अपडेट देत असतं, परंतु युजर्सनेही सतर्क राहण्याची गरज आहे. सायबर क्रिमिनल्सच्या एका ग्रुपकडून WhatsApp वर लोकांची फसवणूक केली जात आहे.

Hello Mom, Dad शा मेसेजने स्कॅमची सुरुवात होते. UK मध्ये सायबर क्रिमिनल्स अशा प्रकारच्या मेसेजचा वापर करुन लोकांना टार्गेट करत आहेत. त्यानंतर तुमच्या मुलांना पैशांची अतिशय गरज असून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलं जातं.

एक्सप्रेस यूकेनुसार, स्कॅमच्या मेसेज कॅपेंनमध्ये काही महिन्यांमध्ये एका व्यक्तीने 50000 डॉलर जवळपास 49,75,683 रुपये गमावले आहे. एका व्यक्तीने फ्रॉड करणाऱ्यांना 3000 पाउंड जवळपास 2,98,540 रुपयांहून अधिक पैसे दिले. त्यांना आपल्या मुलाकडून पैशांची मदत असल्याचा मेसेज आला होता. त्यानंतर त्यांनी हे पैसे ट्रान्सफर केले.

US VP कमला हॅरिस Bluetooth इयरफोन्सला घाबरतात, कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

भारतातही फसवणुकीचे प्रकार -

हे केवळ यूकेमध्ये नसून भारतातही अशाप्रकारच्या फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. इथे स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी मेसेंजरचा वापर करतात.

हॅकर्स एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या रुपात तुमच्या चॅट बॉक्समध्ये पॉपअप मेसेज पाठवतात. हा मेसेज तुमच्या जवळच्या व्यक्तीचा भाऊ, बहीण, खास मित्र, कुटुंबिया असू शकतो आणि याकडून पैशांची मागणी केली जाते. हा मेसेज खरा असल्याचं समजून पैसे ट्रान्सफर केले जातात आणि काही मिनिटांत बँक अकाउंट खाली होतं. आपल्या जवळच्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्याचं वाटतं परंतु अनेकदा ज्याच्या नावाने पैशांची मागणी होते, त्याचं अकाउंट हॅक होऊन तुम्हाला हॅकर्सनेच मेसेज पाठवलेला असू शकतो.

WhatsApp वर चुकूनही करू नका या 8 चुका, अकाउंट कायमसाठी होईल बॅन

कोणीही पैशांची मागणी केल्यास, ज्या संबंधित व्यक्तीच्या नावाने पैशांची मागणी झाली आहे, त्याला थेट संपर्क करुन याबाबत माहिती करुन घेणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Tech news, Whatsapp alert, WhatsApp user