WhatsApp मध्ये धोकादायक Bug, ...तर App अनइन्स्टॉल करुन पुन्हा करावं लागेल डाऊनलोड

WhatsApp मध्ये धोकादायक Bug, ...तर App अनइन्स्टॉल करुन पुन्हा करावं लागेल डाऊनलोड

व्हॉटस अॅपमध्ये एक धोकादायक बग आढळला आहे. यामुळे हॅकर्स एक मेसेज पाठवून तुमचे अॅप क्रॅश करू शकतात.

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : सर्वाधिक लोकप्रिय असं व्हॉटसअॅप हे मेसेंजिग अॅप अनेक नवनवी फिचर्स युजर्सना देत असतं. सातत्याने यामध्ये अपडेट केले जातात. दरम्यान, आता यामध्ये काही त्रुटी असल्याचं समोर येत आहे. व्हॉटस अॅपमध्ये एक धोकादायक बग आढळला आहे. यामुळे हॅकर्स एक मेसेज पाठवून तुमचे अॅप क्रॅश करू शकतात. जर एकदा तुमचे अॅप क्रॅश झाले तर तुम्हाला ते अनइन्स्टॉल करू पुन्हा डाऊनलोड करावं लागेल. त्याशिवाय व्हॉटसअॅप वापरता येणार नाही.

ग्रुप चॅटवर टाकलेल्या एका मेसेजमुळे एकाचवेळी अनेकजणांचे अॅप क्रॅश होऊ शकते असं सायबर सिक्युरिटी फर्म चेकपॉइंटने म्हटलं आहे. सध्या व्हॉटसअॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावरून अनेक मेसेज पाठवले जात असतात. यात फक्त मेसेजच नाही तर डॉक्युमेंट्सचाही समावेश असतो. चेकपॉइंटने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात व्हॉटसअॅपचे 150 कोटींहून अधिक युजर्स आहेत. 10 कोटींपेक्षा जास्त ग्रुप असेलेल्या या अॅपवरून दररोज 65 अब्ज मेसेज पाठवले जातात.

अॅप क्रॅश झाल्यास त्याची चॅट हिस्ट्रीसुद्धा डिलीट होईल. तसेच अॅपही वापरता येणार नाही. ते अनइन्स्टॉल करून पुन्हा डाऊनलोड करावं लागेल. कंपनीला या बगची माहिती देण्यात आली आहे. कंपनीने बग फिक्स केला असून आता अॅप अपडेट करावं असं व्हॉटसअॅपने सांगितलं आहे.

याआधी अँड्रॉइड, आयओएस युजर्सना टार्गेट केलं जात होतं. कंपनीने युजर्सना याबाबत सावधही केलं होतं. सध्या व्हॉटसअॅपवर अनेक फेक लिंक शेअर केल्या जात आहेत. यामधून काही प्रलोभने दाखवली जातात. लिंक शेअर केल्यास एखादी गोष्ट फ्री किंवा त्यावर सूट मिळेल असा दावा केला जातो. प्रत्यक्षात त्यातून असे काहीच लाभ दिले जात नाहीत. ती एक स्पॅम लिंक असते.

First published: December 18, 2019, 10:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading