मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आयफोनच्या 'या' मॉडेल्सवर वापरता येणार नाही व्हॉट्सअ‍ॅप

आयफोनच्या 'या' मॉडेल्सवर वापरता येणार नाही व्हॉट्सअ‍ॅप

 जगभरात अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनचा (Apple iPhone) मोठा चाहता वर्ग आहे. भारतातदेखील आयफोन युजर्सची संख्या लक्षणीय आहे. युजर्सची गरज ओळखून अ‍ॅपल कंपनी सातत्याने नवीन फीचर्स (Features) असलेली आयफोन मॉडेल्स लॉंच करते.

जगभरात अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनचा (Apple iPhone) मोठा चाहता वर्ग आहे. भारतातदेखील आयफोन युजर्सची संख्या लक्षणीय आहे. युजर्सची गरज ओळखून अ‍ॅपल कंपनी सातत्याने नवीन फीचर्स (Features) असलेली आयफोन मॉडेल्स लॉंच करते.

जगभरात अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनचा (Apple iPhone) मोठा चाहता वर्ग आहे. भारतातदेखील आयफोन युजर्सची संख्या लक्षणीय आहे. युजर्सची गरज ओळखून अ‍ॅपल कंपनी सातत्याने नवीन फीचर्स (Features) असलेली आयफोन मॉडेल्स लॉंच करते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट:  जगभरात अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनचा (Apple iPhone) मोठा चाहता वर्ग आहे. भारतातदेखील आयफोन युजर्सची संख्या लक्षणीय आहे. युजर्सची गरज ओळखून अ‍ॅपल कंपनी सातत्याने नवीन फीचर्स (Features) असलेली आयफोन मॉडेल्स लॉंच करते. तुम्ही जर आयफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अ‍ॅपलने इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) संदर्भात नुकतीच एक घोषणा केली आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत आयफोनच्या मॉडेल्सवर व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार आहे. याचाच अर्थ आयफोनची काही मॉडेल्स वापरत असलेल्या युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता येणार नाही. `टीव्ही नाईन हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स ही आयफोनची ओळख आहे. त्यामुळे अनेक युजर्सचा कल आयफोनकडे असल्याचं पाहायला मिळतं. दुसरीकडे व्हॉट्सअ‍ॅप अत्यंत लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. कुटुंबीय, मित्रमंडळी, ऑफिसमधले सहकारी आदींशी संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा प्रामुख्याने वापर होतो. व्हॉट्सअ‍ॅपची वाढती लोकप्रियता लक्षात घेत कंपनीकडून सातत्याने नवीन फीचर्स लॉंच केली जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपण कंटेट, फोटोज, व्हिडिओ, ऑडिओ आदी गोष्टी शेअर करू शकतो. व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलिंगसारख्या सुविधादेखील या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळतात. मात्र, येत्या काही दिवसांत आयफोनच्या काही मॉडेल्सवर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर युजर्सला करता येणार नाही.

हेही वाचा -  काचांच्या खिडक्यांपासूनही वीजनिर्मिती होणार?; जाणून घ्या काय आहे नवीन तंत्रज्ञान

अ‍ॅपलच्या एका सपोर्ट अपडेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही आयफोन मॉडेल्सवर आता व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता येणार नाही. येत्या काही दिवसांत या संदर्भात अंमलबजावणी सुरू होणार आहे. ``व्हॉट्सअ‍ॅप पुढच्या महिन्यात म्हणजेच 24 ऑक्टोबरपासून आयओएस 10 (iOS 10) आणि आयओएस 11 (iOS 11) ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करणाऱ्या मॉडेल्सना सपोर्ट करणार नाही,`` अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅप डेव्हलपमेंटवर सातत्याने लक्ष ठेवून असणारी वेबसाईट WABetaInfo च्या सूत्रांनी दिली आहे.

आयफोन यूजर्सकडे आयओएस 12 (iOS 12) किंवा त्यावरील ओएसवर (OS) काम करणारा फोन असावा. यामुळे त्यांना व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता येईल, असं व्हॉट्सअ‍ॅपनं काही दिवसांपूर्वी आपल्या हेल्प सेंटर पेजवर स्पष्ट केलं होतं. या निर्णयाचा थेट परिणाम आयफोन 5 आणि आयफोन 5c यूजरवर होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने आयओएस 10 आणि आयओएस 11 या व्हर्जनवर काम करणाऱ्या डिव्हाईसच्या युजर्सला यासंदर्भात अलर्ट करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या डिव्हाईसवरील (Device) व्हॉट्सअ‍ॅप लवकरच बंद होणार आहे, अशी सूचना युजर्सला मेसेजच्या माध्यमातून देण्यात येत आहे. याचाच अर्थ जर तुम्हाला आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप सुरू ठेवायचं असेल तर आयफोन तातडीनं अपडेट करणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Iphone, Technology, Whatsaap