नव्या प्रायव्हसीबाबत WhatsApp चा मोठा निर्णय; डेटा शेयरिंग पॉलिसीची डेडलाईन स्थगित
व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आपल्या पॉलिसीमध्ये बदलांबाबत मोठी घोषणा केली आहे. फेसबुकच्या (Facebook) मालकीचं मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने सध्या आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये होणारे बदल पुढे ढकलले आहेत.
नवी दिल्ली, 16 जानेवारी : व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आपल्या पॉलिसीमध्ये बदलांबाबत मोठी घोषणा केली आहे. फेसबुकच्या (Facebook) मालकीचं मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने सध्या आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये होणारे बदल पुढे ढकलले आहेत. कंपनी 8 फेब्रुवारीपासून आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी लागू करणार होती, त्यासाठी युजर्सना एक ‘Terms & Conditions’ मेसेज पॉपअप होत होता. त्याला स्वीकारणं आवश्यक असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आता ही पॉलिसी पुढे ढकलली आहे. कंपनीने सांगितलं की, आमच्या प्रायव्हसी पॉलिसीतील बदलांबाबत युजर्समध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे सध्या ही व्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसी स्थगिती केली जात आहे, जेणेकरुन युजर्सला याबाबत रिव्ह्यू करण्यास आणि समजण्यास आणखी काही वेळ मिळेल.
कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं की, 8 फेब्रुवारीपासून कोणत्याही युजरचं अकाउंट सस्पेंड किंवा डिलीट केलं जाणार नाही. त्यासोबतच आम्ही व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी आणि सिक्योरिटीबाबत पसरत असलेल्या चुकीच्या माहितीबाबत लोकांसमोर स्पष्ट करण्याचं काम करत आहोत.
Thank you to everyone who’s reached out. We're still working to counter any confusion by communicating directly with @WhatsApp users. No one will have their account suspended or deleted on Feb 8 and we’ll be moving back our business plans until after May - https://t.co/H3DeSS0QfO
5 जानेवारीला व्हॉट्सअॅपने आपल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीची घोषणा केली होती. त्यानंतर युजर्सना ही पॉलिसी अॅक्सेप्ट करण्यास सांगितलं जात होतं. 8 फेब्रुवारीपर्यंत पॉलिसी अॅक्सेप्ट न केल्यास अकाउंट डिलीट होणार असल्याचं त्या पॉलिसीमध्ये सांगण्यात आलं होतं. तसंच व्हॉट्सअॅपने ते युजर्सचा डेटा प्रोसेस करून तो फेसबुकसोबत शेअर करणार असल्याचंही आपल्या पॉलिसीमध्ये म्हटलं होतं.
We want to address some rumors and be 100% clear we continue to protect your private messages with end-to-end encryption. pic.twitter.com/6qDnzQ98MP
या नव्या पॉलिसीमुळे युजर्समध्ये नाराजीचं, मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे अनेक युजर्स व्हॉट्सअॅप सोडून दुसऱ्या सुरक्षित मेसेजिंग अॅपकडे वळत असल्याचं चित्र आहे. अनेकांच्या या प्रतिक्रियेनंतर व्हॉट्सअॅपने ही पॉलिसी सध्या स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.