WhatsApp ग्रुपचं नाव ठेवण्याआधी ही बातमी वाचा, तुमच्यासह इतर मेंबरचं अकाउंट होईल बॅन!

WhatsApp ग्रुपचं नाव ठेवण्याआधी ही बातमी वाचा, तुमच्यासह इतर मेंबरचं अकाउंट होईल बॅन!

WhatsApp च्या ग्रुपचं हटके नाव ठेवत असाल तर सावध व्हा. कंपनीकडून तुमच्यासह ग्रुपमधील इतर सदस्यांवरही बंदीची कारवाई होऊ शकते.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया मेसेजिंग अॅप WhatsApp सातत्याने अपडेट देत असतं. त्यावरून मोठ्या प्रमाणावर मेसेज फॉरवर्ड केले जातात. त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी काही पावलं कंपनीकडून उचलली जात आहेत. आता व्हॉटस्अॅपने काही आक्षेपार्ह नावं असलेल्या व्हॉटसअॅप ग्रुपला ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. फक्त ग्रुपवरच नाही तर त्यातील सदस्यांचे खातेही ब्लॉक केलं जात आहे.

व्हॉटसअपने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी सोशल मीडियावर मात्र ही गोष्ट समोर येत आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार एका युजरने अशा प्रकारे अकाउंट बॅन केलं असल्याचं म्हटलं आहे. संबंधित युजरने विद्यापीठाच्या ग्रुपचं नाव बदलून ते चाइल्ड पॉर्नोग्राफी असं केलं. त्यानंतर अचानक त्याला बॅन केलं गेलं. एवढंच नाही तर ग्रुपमधील प्रत्येक सदस्याला बॅन करण्यात आलं आहे.

युजरने व्हॉटसअॅपशी संपर्क साधून याची माहिती घेतली. तेव्हा समजलं की, नियमांचे उल्लघंन केल्यानं कंपनीने कारवाई केली. बॅन केलेल्या सदस्यांचे अकाउंट सात दिवसांनी सुरू करण्यात आलं.

वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस ज्याप्रमाणे वाढतेय, त्याप्रमाणे याचा गैरवापर करणाऱ्यांची संख्याही वाढतेय. गैरवापराला आळा घालण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आता व्हॉटस अ‍ॅपने संशयास्पद नावे असणारे व्हॉटस अ‍ॅप ग्रुप्स ब्लॉक करण्यास प्रारंभ केला आहे. त्या आक्षेपार्ह नाव असलेल्या ग्रुपमधील प्रत्येक सदस्यावर व्हॉट्स अ‍ॅप बंदी घातली जात आहे. याबाबत सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून अद्याप व्हॉट्स अ‍ॅपने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

याशिवाय आणखी एका युजरने तक्रार केली आहे की, त्यानेही 5 जणांच्या व्हॉटसअॅप ग्रुपचे नाव बदलले. ग्रुपचे नाव डिसगस्टिंग असं ठेवल्यानंतर बॅन करण्यात आलं. नाव बदलल्यानंतर काही तासांच्या आतच सर्व सदस्यांवर बंदीची कारवाई झाली. त्यानंतर सर्व सदस्यांचे व्हॉटसअॅप तब्बल 27 दिवसांनी सुरू झाल्याचं म्हटलं आहे.

सोशल मीडियावरून भडक वक्तव्ये, खोट्या बातम्या पसरू नयेत यासाठी कंपन्यांकडून अशा प्रकारची पावले उचलली जात आहेत. व्हॉटसअॅपने अद्याप याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, ग्रुपला आक्षेपार्ह नाव दिल्यास त्या ग्रुपला अॅटोमॅटिक बॅन करण्याची प्रणाली नव्या अपडेटमध्ये असू शकते.

वाचा : चित्रं काढण्याच्या सवयीमुळे 9 वर्षीय मुलाला शिक्षक ओरडायचे, आता होतंय कौतुक

AntiVirus पासून तुमच्या स्मार्टफोनला धोका, या 10 Apps पैकी तुम्ही कोणतं वापरताय?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: whatsapp
First Published: Nov 16, 2019 08:00 AM IST

ताज्या बातम्या