WhatsApp युझरसाठी मोठी बातमी, 'ही' चुक केल्यास बॅन होऊ शकते अकाउंट

WhatsApp युझरसाठी मोठी बातमी, 'ही' चुक केल्यास बॅन होऊ शकते अकाउंट

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझरने एक महत्वाची माहिती दिली आहे. WABetaInfoने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात व्हॉट्सअ‍ॅपची सुधारित अपडेटेड अ‍ॅप वारण्यास मनाई आहे.

  • Share this:

व्हॉट्सअ‍ॅपवरही (WhatsApp) आता हॅकिंग आणि फसवणूकीची माहिती समोर येत आहे. हे लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझरने एक महत्वाची माहिती दिली आहे. WABetaInfoने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात व्हॉट्सअ‍ॅपची सुधारित अपडेटेड अ‍ॅप वारण्यास मनाई केली आहे.

WABetaInfo ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "व्हॉट्सअ‍ॅपची अपडेटेड व्हर्जन सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी चांगला उपाय नाही आहे." यासह त्यांनी एक फोटो देखील अपलोड केला आहे. यामध्ये दिसत आहे की, व्हॉट्सअ‍ॅपचे हे व्हर्जन खोटे असून फेक व्हॉट्सअ‍ॅप MITM अटॅकद्वारे (man in the middle) आपला मजकूर सहज बदलू आणि एडिट करू शकतात.

एवढेच नव्हे तर वॉर्निंगमध्ये असेही सांगितले गेले की कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेटेड व्हर्जनची पडताळणी केलेली नाही. तर जर एखादा युझर त्यांचा वापर करत असेल तर त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवरही बंदी होऊ शकते.पुढे असेही लिहिले आहे की ओरिजनल व्हॉट्सअॅपच्या तुलनेत या अपडेटेड व्हर्जनमध्ये 20 पेक्षा जास्त नवीन फिचर्स आहेत.

वाचा-रिक्वेस्ट न पाठवताही फेसबुक प्रोफाइलमध्ये घुसली अनोळखी व्यक्ती, डोंबिवलीत खळबळ

वाचा-Airtel, Vodafone-Idea ग्राहकांसाठी मोठी बातमी, ट्रायने ब्लॉक केले 'हे' प्लॅन्स

Animated Stickers केले लॉंच

व्हॉट्सअॅपने अलीकडेच अँड्रॉइड आणि iOS युझरसाठी अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स लॉन्च केले आहेत. अ‍ॅपच्या स्टिकर स्टोअरजवळ अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स स्टोअरचा पर्यायही युजर्स पाहतील. त्यापुढील एक प्ले बटण दिले गेले आहे जेणेकरुन जुन्या स्टिकर्स आणि नवीन मधील फरक आढळून येईल. Playful Piyomaru, Bright Days, Moody Foodies, और Chummy Chum Chums हे स्टिकर्स अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध आहेत. व्हॉट्सअ‍ॅप आता डेस्कटॉप व्हर्जनसाठीही रोलआऊट करीत असल्याचे दिसत आहे.

वाचा-सावधान! तुम्हालाही Tiktok Pro चा मेसेज आला आहे का? लिंकवर क्लिक कराल तर...

Published by: Priyanka Gawde
First published: July 14, 2020, 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading