Alert! WhatsApp कडून मोठी घोषणा, 'असे' मेसेज केल्यास होईल कायदेशीर कारवाई

Alert! WhatsApp कडून मोठी घोषणा, 'असे' मेसेज केल्यास होईल कायदेशीर कारवाई

Whatsapp वर ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये एका वेळी भरपूर लोकांना मेसेज पाठवायची आपली सवय आहे का? सावधान! आधी ही बातमी वाचा...

  • Share this:

मुंबई, 15 जून : WhatsApp चा गैरवापर करण्याऱ्यांना यापुढे लवकरच कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्याची वेळ येऊ शकते. आपला कुठला अजेंडा पुढे रेटण्यासाठी, फेक न्यूज पसरवण्यासाठी किंवा आणखी कुठल्या उद्देशाने एकाच वेळी अनेक लोकांना मेसेज पाठवल्यास whatsapp कारवाई करणार आहे. ऑटोमेटेड मेसेज केल्यास किंवा नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. WhatsApp च्या FAQ पेजवरच्या Unauthorized usage of WhatsApp policy या विभागात असं नमूद करण्यात आलं आहे की, 7 डिसेंबरनंतर एकावेळी भरपूर मेसेज आणि ऑटोमेटेड मेसेजेस पाठवल्यास त्या युजरवर  कारवाई होऊ शकते. कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येईल हे मात्र कंपनीकडून अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. एका रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये WhatsAppचा गैरवापर करण्यात आला. त्याचवेळी फ्री क्लोन अॅप आणि एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एका वेळी भरपूर लोकांना पाठवले गेलेले मेसेजेस म्हणजेच Bulk messages करण्यात आले होते.

रेल्वेनं 'या' पदांसाठी काढल्यात 95 व्हेकन्सीज्, 30 जूनच्या आधी करा अर्ज

 Fake news पसरवल्या जातात त्यासाठी हेच माध्यम सर्वात जास्त प्रमाणावर वापरलं जातं, असा आरोप व्हॉट्सअॅपवर होत असतो. याची दखल कंपनीनं घेतल्याचं दिसतं.  WhatsApp वर वारंवार येण्याऱ्या फेक न्यूज आणि दुर्भावनापूर्ण मेसेज पसरण्याचे प्रमाण सातत्याने वाढल्याने हे अॅप नेहमीच भारत सरकारच्या निशाण्यावर होतं.

लवकरच लाँच होतेय तुमच्याशी बोलणारी कार

त्यामुळेच हा अपडेट आणि अलर्ट समोर आल्याचं कळतं. वास्तविक अॅप डाउनलोड करताना आपण Terms and Conditions न वाचता क्लिक करून मोकळे होतो. त्यामध्ये त्या अॅप वापरण्यासंदर्भातले सगळे नियम आणि कायदे नमूद असतात. आता त्यामध्येच whatsapp नवी तरतूद आणणार असल्याचं सूत्रांकडून समजतं.

फेक न्यूजकरिता यापूर्वी घेतले गेले हे निर्णय

यापूर्वी WhatsApp ने भारतात फेक न्यूजचा प्रसार थांबवण्यासाठी कंपनीने एक मेसेज एका वेळी फक्त 5 लोकांनाच पाठवता येईल, असा बदल फॉरवर्डिंग फीचरमध्ये करण्यात आला होता. पण, त्यानंतरदेखील अॅपचा गैरवापर झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्याने कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला.

First published: June 15, 2019, 8:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading