Home /News /technology /

WhatsApp Account ही होऊ शकतं चोरी, जाणून घ्या कसं कराल Recover

WhatsApp Account ही होऊ शकतं चोरी, जाणून घ्या कसं कराल Recover

WhatsApp Account चोरीही होतं? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? WhatsApp अकाउंट चोरी होऊन कोणी दुसरा व्यक्तीही याचा वापर करू शकतो.

  नवी दिल्ली, 20 जानेवारी : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. WhatsApp Account चोरीही होतं? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? WhatsApp अकाउंट चोरी होऊन कोणी दुसरा व्यक्तीही याचा वापर करू शकतो. अकाउंटची चोरी अधिकतर युजर्सच्या निष्काळजीपणामुळे होते. यामागे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. WhatsApp SMS वेरिफिकेशन कोड आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट चोरी होऊ शकतं. वेरिफिकेशन कोड - युजर्सने आपला WhatsApp SMS वेरिफिकेशन कोड कोणाशीही शेअर करू नये. जर कोड चुकून शेअर केला, तर WhatsApp अकाउंटचा अ‍ॅक्सेस तुम्ही गमावू शकता. परंतु तुम्ही अकाउंट रिकव्हर करण्यासाठी काही ट्रिक्सचा वापर करू शकता.

  (वाचा - Private Sector मध्ये Jobs च्या शोधात आहात? या सरकारी पोर्टलवर मिळेल माहिती)

  तुमचं WhatsApp Account इतर कोणी वापरत असल्याचं वाटत असल्यास तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना याबाबत माहिती द्या, की तुमचं अकाउंट चोरी करुन इतर कोणी मेसेज पाठवत आहे. चोरी करणारा व्यक्ती तुमचं आधीचं चॅट वाचू शकत नाही, कारण WhatsApp सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एन्क्रिप्टेड आहे.

  (वाचा - Phishing Email म्हणजे नेमकं काय? यापासून राहा सावध, अन्यथा बसू शकतो मोठा फटका)

  असं करा अकाउंट रिकव्हर - तुमच्या फोन नंबरवरुन WhatsApp मध्ये Sign-in करा आणि नंतर SMS मध्ये आलेल्या 6 अंकी कोडने फोन नंबर वेरिफाय करा. 6 अंकी कोड टाकल्यानंतर चोरी करुन तुमचं अकाउंट वापरणारा व्यक्ती आपोआप लॉग-आउट होईल. तुमच्याकडे टू-स्टेप वेरिफिकेशन कोड मागितला जाऊ शकतो. जर तुम्हाला हा कोड माहित नसेल, तर अकाउंट चोरी करणाऱ्या व्यक्तीने तुमचं टू-स्टेप वेरिफिकेशन फीचर सुरू केलं आहे, असं होऊ शकतं.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Tech news, Whatsapp alert, Whatsapp News

  पुढील बातम्या